Download App

श्रीगोंद्यात महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाच्या नेत्याने रणशिंग फुंकलं…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटाकडून साजन पाचपुते तर राष्ट्रवादीकडून राहुल जगताप इच्छुक आहेत.

Image Credit: Letsupp

Rahul Jagtap : लोकसभेत उत्तुंग यश संपादित केल्यानंतर महाविकास आघाडीकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरु आहे. यातच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात आता उमेदवारीवरून मविआमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आघाडीमध्ये श्रीगोंद्याची जागा ही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे आहे. या ठिकाणाहून राहुल जगताप (Rahul Jagtap) हे उमेदवारीच्या तयारीत आहे तर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून साजन पाचपुते (Sajan pachpute) हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे.

मोठी बातमी! फटाका कारखान्यात एकामागे एक भीषण स्फोट; वटपौर्णिमेमुळे अनर्थ टळला

दरम्यान, विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असे म्हणत एक प्रकारे साजन पाचपुते यांनी विधानसभेचे रणशिंगच या माध्यमातून फुंकले. मात्र, महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी ही जागा ठाकरे गटासाठी सोडणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. पाचपुते यांच्या दाव्याने निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून बिघाडी होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचा ५८ वा वर्धापनानिमित्त शिवसेना जिल्हाउपप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसैनिक कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी साजन पाचपुते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, स्व.सदाअण्णा पाचपुते यांनी तालुक्यात केलेले काम सर्वाना ज्ञात आहे. त्यामुळे कोणी कितीही ताकद लावली तरी सामान्य जनता आपल्या बरोबर आहे. त्यांना न्याय देण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांनी जाहीर सभेत बोलताना सांगितले.

पुढे बोलताना साजन पाचपुते यांनी विधानसभा निवडणुकीत विरोधकांसमोर मोठा स्पर्धक तयार झाल्यामुळे मला बदनाम करण्यासाठी काहीनी षडयंत्र चालू केले आहे. पण मी कोणाला घाबरणारा नाही. श्रीगोंदा विधानसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी कामाला लागावे. तळागाळातील सामान्य लोकांची कामे करुन पुढे येणाऱ्यांना घडवायचे आहे. पक्षात कोणावरही अन्याय होणार नाही. यापुढे तालुक्यात ग्रामपंचायत, सेवासंस्था निवडणूकीत उभे रहा सर्व ताकद देण्यासाठी मी बांधील राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

VIDEO: मुरलीधर मोहोळ शंकर महाराज मठात दर्शनासाठी आले अन् भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

लोकसभेत महायुतीला फटका बसला असून महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. यामुळे येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक असून प्रत्येक ठिकाणी उमेदवारी देताना राजकीय पक्षांकडून योग्य ती चाचपणी देखील केली जाते आहे. यातच श्रीगोंदा येथे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होणार आहे. यामुळे लोकसभेचं वचपा काढण्यासाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरु आहे.

महायुतीकडून भाजपकडून बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते हे उमेदवारीच्या तयारीमध्ये आहेत. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून अनुराधा नागवडे यांनी देखील तयारी सुरु केली आहे. श्रीगोंद्याचा भावी आमदार हा नागवडे कुटुंबियातीलच असणार असे म्हणत नागवडेंनी विधानसभेचे रणशिंग फुंकले. तर मविआमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून राहुल जगताप, ठाकरे गटाकडून साजन पाचपुते तर काँग्रेसकडून घनश्याम शेलार हे उमेदवारीच्या तयारीमध्ये आहे.

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबरमध्ये घोषित होऊ शकतात अशी चर्चा सध्या सुरु आहे. मात्र, विधानसभेपूर्वीच इच्छुक उमेदवारांची वाढती यादी पाहता व सभांमध्ये होत असलेली जाहीर वक्तव्य हे राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरू शकते.

follow us

वेब स्टोरीज