मोठी बातमी! फटाका कारखान्यात एकामागे एक भीषण स्फोट; वटपौर्णिमेमुळे अनर्थ टळला
Explosion In Firecracker Factory : सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातीत फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना आज घडली. येथे एकामागे एक झालेल्या भीषण स्फोटामुळे हा परिसर हादरला आहे. (Firecracker Factory) दरम्यान, आज वटपोर्णिमा असल्यामुळे या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. या कारखान्यात जवळपास 15 महिला मजूर म्हणून काम करतात. (Neet) मात्र, आज वटपोर्णिमा असल्यामुळे या सर्व महिलांनी सुट्टी घेतली होती. (CBSE) त्यामुळे मोठा अनर्थ टळला अशीच भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. युन्नूस मुलाणी यांच्या मालकीचा हा फटाका कारखाना आहे.
परिसर हादरला चे भूत मानगुटीवर; शिक्षण देता येत नसल्याने नैराश्य; लातूरमध्ये माय-लेकीने संपवलं जीवन
येथील युन्नूस मुलाणी यांचा बार्शी तालुक्यातील घारी गावात फटाका कारखाना आहे. या कारखान्याला आज अचानक आग लागली. त्यानंतर कारखान्यातून स्फोटांचे मोठमोठे आवाज परिसरात ऐकू येऊ लागले. धुरांचे लोट परिसरात लांबच्या लांब दिसत होते. हा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या परिसराला चांगलाच हादरा बसला. स्फोट झालेल्या त्या फटाका कारखान्यात जवळपास 15 महिला मजूर काम करतात. परंतु, आज वटपौर्णिमा आहे. त्यामुळे पुजेसाठी या महिलांनी सुट्टी घेतली होती. कोणतीही महिला कामाला गेली नव्हती. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलं नाही.
कारखान्याचे मोठे नुकसान खडसेंनी घेतली अमित शाहांची भेट; फडणवीसांना धक्का देत कमबॅकची तयारी?
फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात सुदैवाने कुठल्याही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारखाना मालकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. या घटनेत सुमारे ४० लाखांचे फटाके जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती पांगरी पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, पांगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते पुढील कारवाई करणार आहेत.