धक्कादायक! विजेच्या धक्क्याने पाण्याच्या ओढ्यात उतरलेल्या २४ म्हशींचा जागीच मृत्यू

धक्कादायक! विजेच्या धक्क्याने पाण्याच्या ओढ्यात उतरलेल्या २४ म्हशींचा जागीच मृत्यू

Death Buffaloes By Light Current : उत्तर सोलापूर तालुक्यातील (Light) गुळवंची येथे धक्कादायक घटना घडली आहे. पाण्याने भरलेल्या ओढ्यात विजेची तार तुटून पडल्याने पाण्यातील तब्बल २४ म्हशी विजेचा धक्का बसून जागीच मृत्युमुखी पडल्या आहेत. (Buffaloes ) सायंकाळच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला आहे.

हेमंत सोरेन पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी; राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दिली शपथ

सोलापूर-बार्शी रस्त्यावर गुळवंची गावात राहणारे हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे या दोन्ही बंधुंचा दुग्ध उत्पादन व गोपालनाचा व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे हरिदास भजनावळे यांनी म्हशी चारण्यासाठी गुळवंची शिवारात नेल्या होत्या. तेथेच असलेल्या ओढा प्रवाहीत झाला असताना त्या ओढ्यात विजेची तार अगोदरच तुटून पडली होती.

या ठिकाणी तार पडलेली आहे किंवा त्याला करंट आहे हा अंदाज काही भजनावळे यांना आला नव्हता. म्हशी ओढ्याजवळ जाऊन पाण्यात उतरल्या. तेव्हा काही क्षणातच सर्व २४ म्हशी जागीच गतप्राण झाल्या. ही बाब भजनावळे यांना लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून उर्वरीत चार म्हशींना ओढ्यात उतरण्यापासून रोखले. त्यामुळे त्या चार म्हशींचे प्राण वाचले.

Team India : विजयाचा जल्लोष, वानखडे स्टेडियममध्ये टीम इंडियाने धरला ढोल ताशावर ठेका, पाहा व्हिडिओ

दरम्यान, ही घटना समजताच गावकरी संतप्त होऊन रस्त्यावर आले. महावितरणच्या गलथान कारभारामुळेच विजेची तार तुटून ओढ्यात पडली आणि त्यातून २४ म्हशींना प्राण गमवावे लागल्याबद्दल गावककऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसंच, रास्ता रोको केला. दरम्यान, महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर घटनेचा पंचनामा करावा आणि म्हशींच्या प्राणहानीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज