हेमंत सोरेन पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी; राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दिली शपथ

हेमंत सोरेन पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी; राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दिली शपथ

Hemant Soren Take Oath as cm : झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी पुन्हा झारखंड राज्याची सुत्र हातामध्ये घेतली आहेत. (Jharakhand) त्यांनी आता राज्याचे तेरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. (Hemant Soren) राजभवनामध्ये झालेल्या सोहळ्यात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Video: विश्वविजेता टीम इंडियाची विजय मिरवणूक , वानखेडे हाउसफुल, पहा व्हिडिओ

मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये हेमंत सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर २८ जून रोजी त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. तत्पूर्वी जमीन गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक होण्यापूर्वी सोरेन यांनी ३१ जानेवारी रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या पदाची सूत्रे चंपई सोरेन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली होती. आता चंपई सोरेन यांच्याकडे पक्षातील अन्य जबाबदाऱ्या सोपवल्या जातील असं हेमंत सोरेन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान, या सोहळ्याला हेमंत सोरेन यांचे पिता आणि पक्षाचे सर्वोच्च नेते शिबू सोरेन, त्यांची आई रूपी सोरेन, पत्नी कल्पना सोरेन आणि मित्र पक्षांचे नेते उपस्थित होते. मावळते मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचीही यावेळी उपस्थिती होती.

विरोधकांचे कारस्थान यशस्वी

कार्यकर्ते आणि नेत्यांना उद्देशून जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात हेमंत सोरेन यांनी विरोधकांनी कारस्थान रचलं होतं असा थेट आरोप केला आहे. या कारस्थानामध्ये विरोधकांना यश आलं त्यामुळेच मला पाच महिने तुरुंगात काढावे लागले. याविरोधात मी कायदेशीर लढाईचा मार्ग निवडला होता. तुम्ही मला रस्त्यांवर देखील पाठिंबा दिला. आज न्याय झाला असून माझी तुरुंगातून सुटका झाली आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बिरसा मुंडा यांच्याकडून प्रेरणा विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे ३ उमेदवार निश्चित

झारखंडमधील चंपई सोरेन पर्व संपुष्टात आले असून झारखंड मुक्ती मोर्चामध्ये बाहेरच्या लोकांना कसल्याही प्रकारचे स्थान नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. मावळते मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्याकडून प्रेरणा घेत भ्रष्ट हेमंत सोरेन यांच्याविरोधात उभे राहायला हवे होते अशा शब्दांत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टोलेबाजी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज