हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू धीरज साहूंच्या नावावर; ईडीचा दावा!
Hemant Soren News : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेदरम्यान, अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं होतं. आता ईडीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू गाडी ओडीशातील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या नावावर असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.
Lok Sabha 2024 : उत्तरप्रदेशमध्ये भाजपला तब्बल 70 जागा; काँग्रेस-सपा, बसपाचा सुपडासाफ होणार
जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून काही दिवसांपूर्वीच हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी धाड टाकण्यात आली होती. ईडीकडून ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी ईडीने हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू गाडी जप्त केली होती. त्यानंतर ईडीने या गाडीची झाडाझडती घेतली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या नावावर गाडीची नोंदणी असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांना 5 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. हेमंत सोरेन यांना ईडीने 31 जानेवारी रोजी अटक केली होती. ईडीने एमपीएमएलए कोर्टाकडे त्यांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. त्यापूर्वी हेमंत सोरेन यांची कसून चौकशी केल्यानंतर ईडीने अटक केली होती. चौकशीला समोरे जाण्यापूर्वी सोरेन यांनी राजभवन गाठून राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
अटकेनंतर सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सुनावणीसाठी न्यायालयाने 2 फेब्रुवारीची तारीख दिली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्यांना या प्रकरणी थेट सुप्रीम कोर्टात का आले, असा सवाल केला. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हेमंत सोरेन यांच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी सांगितले की, हे प्रकरण मुख्यमंत्र्यांशी संबंधित आहे. त्यामुळे आम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात आलो आहोत.
आता मुख्यमंत्रिपदी गटनेते चंपाई सोरेन विराजमान झाले आहेत तर दुसरीकडे हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होत आहे. कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी ईडीने हेमंत सोरेन यांच्या घरी छापेमारी केली होती. त्यांच्यावर कथित जमीनीसंदर्भात मनी लॉन्ड्रिंगचा आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र, माझ्याविरोधात कोणताही पुरावा नसून तरीही मला ईडीकडून अटक करण्यात आल्याचं स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या याचिकेवर काय होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.