हेमंत सोरेन मंत्रिमंडळात 11 नव्या चेहऱ्यांना संधी; कोणाला मिळाली संधी?

हेमंत सोरेन मंत्रिमंडळात 11 नव्या चेहऱ्यांना संधी; कोणाला मिळाली संधी?

Hemant Soren Cabinet Expansion : झारखंडमध्ये हेमंत सोरेन (Hemant Soren) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. एकूण 11 चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या सहा आमदारांना मंत्री करण्यात आलंय. काँग्रेसच्या चार आमदारांना सोरेन मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. राजदचे संजय प्रसाद यादव मंत्री झाले आहेत. हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळात (Jharkhand Cabinet) 11 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये राजकीय समीकरणांसोबतच जातीय समीकरणेही ध्यानात ठेवण्यात आली आहेत.

सत्तास्थापनेनंतर पहिला निर्णय ‘लाडकी बहीण योजने’चा ; दीपक केसरकरांनी काय सांगितलं?

हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळात त्यांना चौथ्यांदा मंत्री करण्यात आले आहे. हफिझुल हसन अन्सारी यांनी उर्दूमध्ये शपथ घेतली. शपथ घेताना ते म्हणाले की, मी अल्लाहच्या नावाने शपथ घेतो की, मी सत्य आणि प्रामाणिकपणे काम करेन. यावेळी हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळात अल्पसंख्याक समाजातील दोन मंत्री करण्यात आले आहेत. राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी सर्व आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यात मधुपूरचे आमदार हाफिझुल हसन अन्सारी यांची सर्वाधिक चर्चा होत आहे. कारण त्यांनी गेल्या 4 वर्षात चौथ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

आम्हाला विश्वास … एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील ; उदय सामंत

कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांना फेब्रुवारीमध्ये ईडीने अटक केली तेव्हा चंपाई सोरेन यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री करण्यात आले. त्यावेळीही हाफिझुल हसन अन्सारी यांना मंत्री करण्यात आले होते, त्यानंतर हेमंत सोरेन तुरुंगातून परतल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना पुन्हा मंत्री करण्यात आले. हाफिझुल हसन अन्सारी सलग चौथ्यांदा मंत्री झाले आहेत. याआधी अन्सारी यांनी अल्पसंख्याक कल्याण विभाग, पर्यटन, कला, संस्कृती, क्रीडा आणि युवक व्यवहार खाते सांभाळले होते. अन्सारी हे सीएम सोरेन यांच्या जवळचे मानले जातात.

हेमंत सोरेन सरकारच्या नवीन मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी

1. राधाकृष्ण किशोर – काँग्रेस
2. दीपक बिरुआ – झारखंड मुक्ती मोर्चा
3. चमरा लिंडा – झारखंड मुक्ती मोर्चा
4. संजय प्रसाद यादव – राजद
5. रामदास सोरेन – झारखंड मुक्ती मोर्चा
6. इरफान अन्सारी – काँग्रेस
7. हफिझुल हसन अन्सारी – झारखंड मुक्ती मोर्चा
8. दीपिका पांडे सिंग – काँग्रेस
9. योगेंद्र प्रसाद – झारखंड मुक्ती मोर्चा
10. सुदिव्य कुमार सोनू – झारखंड मुक्ती मोर्चा
11. शिल्पा नेहा टिर्की- काँग्रेस

follow us
  • fb
  • instagram
  • youtube