Hemant Soren : अटक होणारे हेमंत सोरेन तिसरे CM; ‘झारखंड’मध्ये आज काय घडणार ?

Hemant Soren : अटक होणारे हेमंत सोरेन तिसरे CM; ‘झारखंड’मध्ये आज काय घडणार ?

Hemant Soren : झारखंड राज्याचे मुख्यमंत्री (Jharkhand) हेमंत सोरेन यांना (Hemant Soren) काल ईडीने जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी केल्यानंतर अटक केली. या कारवाईने देशभरात खळबळ उडाली आहे. अटक झाल्यानंतर सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अशा पद्धतीने अटक होणारे ते तिसरे मुख्यमंत्री बनले आहेत. याआधी हेमंत सोरेन यांचे वडिल शिबू सोरेन आणि त्यानंतर मधु कोडा यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली होती.

हेमंत सोरेन यांनी 29 डिसेंबर 2019 रोजी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतला होता. त्यांना अटक करण्याआधी ईडीने जवळपास सात तास चौकशी केली. आधी त्यांना कार्यालयात घेऊन जाण्यात आले. येथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री चंपाई सोरेन मुख्यमंत्री (Champai Soren) बनले आहेत.

Jharkhand New CM : हेमंत सोरेन यांचा राजीनामा, चंपाई सोरेन होणार नवीन मुख्यमंत्री

आजचा दिवस सोरेन यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा राहणार आहे. आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे चंपाई सोरेन आजच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. ईडीने अटक केल्यानंतर सोरेन झारखंड उच्च न्यायालयात पोहोचले आहेत. त्यांनी ईडीविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सकाळी साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे.

हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर आदिवासी संघटनांनी जोरदार निदर्शने केली. तसेच आज राज्य बंदची हाक देण्यात आली आहे. केंद्रीय सरना समितीचे अध्यक्ष अजय टिर्की यांनी सांगितले की या बंद आंदोलनात 15 ते 20 संघटना सहभागी होणार आहेत. अत्यावश्यक सेवांवर या बंदचा कोणताही परिणाम होणार नाही.

झारखंडमध्येही राबडीदेवी पॅटर्न? CM होण्याची चर्चा असलेल्या कल्पना सोरेन आहेत तरी कोण?

दरम्यान, कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी सोरेने यांची ईडीकडून चौकशी झाली. सोमवारी ईडीकडून त्यांच्या निवासस्थानावर छापा टाकला होता. हेमंत सोरेन यांना अचक झाल्यानंतर चंपाई सोरेन राज्याचा कारभार हाती घेतील हे आता निश्चित झाले आहे. झारखंडमध्येही बिहारचीच पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा होती. मात्र तसे काही घडले नाही. हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सुत्रे सोपवणार असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांचे नाव मागे पडले आहे. चंपाई सोरेन आजच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात असे सांगण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube