‘झारखंड टायगर’ चंपाई सोरेन आहेत तरी कोण?

‘झारखंड टायगर’ चंपाई सोरेन आहेत तरी कोण?

champai soren : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर आता हेमंत सोरेन यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता विधीमंडळाच्या पक्ष नेतेपदी चंपाई सोरेन (champai soren) यांची निवड करण्यात आली आहे. अर्थात पुढील मुख्यमंत्री चंपाई सोरेन हेच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता झारखंडचे नवे टायगर चंपाई सोरेन नेमके कोण आहेत? याचीच चर्चा रंगू लागली आहे.

सत्ताधारी आमदारांवर महापालिका मेहरबान; मुंबईकरांचा पैसा सरकारच्या बापाचा का? काँग्रेसचा संतप्त सवाल

चंपाई सोरेन हे सरायकेला-खरसावन जिल्ह्यातील जिलिंगगोडा गावचे रहिवासी असून त्यांच्या वडिलांचे नाव सिमल सोरेन असं आहे. पेशाने ते शेतकरी आहेत. चार मुलांमध्ये चंपाई हा मोठा मुलगा आहे. चंपाई यांनी सरकारी शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतले. दरम्यान, त्यांचे लहान वयातच माणको यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतर चंपाई यांनी ४ मुले आणि तीन मुली झाल्या.

आरोग्य विभागात 1729 पदांची भरती, महिन्याला 1 लाख 77 हजारांहून अधिक पगार, कोण करू शकतं अर्ज?

बिहारपासून वेगळ्या झारखंड राज्याची मागणी जोर धरू लागली. शिबू सोरेन यांच्यासोबत चंपाई सोरेन देखील झारखंडमधील चळवळीत सामील झाले. लवकरच ते ‘झारखंड टायगर’ या नावाने प्रसिद्ध झाले होते. यानंतर चंपाई सोरेन यांनी सरायकेला मतदारसंघातून पोटनिवडणुकीत अपक्ष आमदार बनून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ते झारखंड मुक्ती मोर्चात सहभागी झाले.

CM शिंदेंना धक्का, मंत्री सामंतांचे बंधू बंडाच्या तयारीत; काँग्रेस नेत्याची भेट घेत निवडणुकीचं प्लॅनिंग?

भाजप नेते अर्जुन मुंडा यांच्या 2 वर्षाच्या 129 दिवसांच्या सरकारमध्ये JMM नेते चंपाई सोरेन यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले आणि त्यांना महत्त्वाची मंत्रिपदे देण्यात आली. चंपाई 11 सप्टेंबर 2010 ते 18 जानेवारी 2013 पर्यंत मंत्री होते. यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आणि त्यानंतर हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा सरकारमध्ये चंपाई सोरेन यांना अन्न, नागरी पुरवठा आणि वाहतूक मंत्री करण्यात आले.

दरम्यान, हेमंत सोरेन 2019 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर, चंपाई सोरेन यांना परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री करण्यात आले आहे. चंपाई झामुमोच्या उपाध्यक्षाही आहेत. आता त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे. यानंतर चंपाई झारखंडच्या नवीन मुख्यमंत्री असतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube