हेमंत सोरेन यांची ED कडून कसून चौकशी सुरू; अटक झाल्यास आमदारांच्या सह्यांसह प्लॅन B अन् C तयार

हेमंत सोरेन यांची ED कडून कसून चौकशी सुरू; अटक झाल्यास आमदारांच्या सह्यांसह प्लॅन B अन् C तयार

Hemant Soren : जमीन घोटाळ्यात अडकलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अशा परिस्थितीत हेमंत सोरेन यांच्या जागी त्यांची पत्नी कल्पना सोरेन (Kalpana Soren) यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जेएमएमने प्लॅन बी तयार केला आहे. एका कोऱ्या कागदावर आमदारांच्या सह्याही घेण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कागदपत्रे कल्पना सोरेन आणि चंपाई सोरेन (Champai Soren) या दोन संभाव्य उमेदवारांच्या पाठिंब्याची आहेत, त्यापैकी एक हेमंत सोरेन यांना अटक झाल्यास राज्यपालांना सादर केले जाऊ शकते.

पहिला दस्तऐवज मुख्यमंत्र्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्या समर्थनार्थ असल्याचे सांगण्यात येत आहे. हेमंत सोरेन यांना अटक झाल्यास सरकारची सूत्रे कल्पना सोरेन यांच्या हाती दिली जाऊ शकतात. दुसरा पेपर JMM नेते चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाला समर्थन देणारा आहे. मात्र, या बैठकीला सर्वपक्षीय आमदार उपस्थित नव्हते. जेएमएमचे सात आमदार बैठकीला अनुपस्थित होते. यामुळे जेएमएम पक्षात फुटीची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, हेमंत सोरेन यांचे धाकटे भाऊ बसंत सोरेन आणि मुख्यमंत्र्यांच्या वहिनी सीता सोरेन यांना JMM च्या 18 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाचे संस्थापक शिबू सोरेन यांचाही बसंत सोरेन यांना पाठिंबा दिल्याचे बोलले जाते.

झारखंडमध्येही राबडीदेवी पॅटर्न? CM होण्याची चर्चा असलेल्या कल्पना सोरेन आहेत तरी कोण?

राज्याच्या विधिमंडळात सत्ताधारी आघाडीचे सध्याचे संख्याबळ 49 आहे. यामध्ये JMM चे 29, काँग्रेसचे 16, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) मधील एक, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) लिबरेशन (CPI(ML)L) आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) यांच एक-एक आमदार आहे.

व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन सध्या राजकारणात नाहीत. त्या रांचीमध्ये प्ले स्कूल चालवतात. संथाली, ओडिया, हिंदी आणि इंग्रजी यांसारख्या भाषांवरही कल्पना यांचे प्रभुत्व आहे. त्यांनी एमबीएची पदवीही घेतली आहे. झारखंडमधील एक व्यावसायिक महिला आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही त्यांची ओळख आहे.

राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक, पश्चिम बंगालमध्ये हल्ल्यात एसयूव्हीची फुटली काच

कायदेशीर अडथळे येऊ शकतात
तज्ज्ञांच्या मते कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्यात कायदेशीर अडथळे येऊ शकतात. घटनात्मक तरतुदींनुसार विधानसभेचा कार्यकाळ एक वर्षांपेक्षा कमी शिल्लक असेल, तर मध्यावधी निवडणुका होऊ शकत नाहीत. अशा स्थितीत कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनणे कठीण जाईल, कारण त्या आमदार नाहीत. असा अडथळा निर्माण झाला तर दुसऱ्याला मुख्यमंत्री केले जाईल. मात्र, बुधवारी ईडीच्या चौकशीनंतरच सर्व काही ठरवले जाईल, कारण हेमंत सोरेन यांना अटक झाली नाही तर तेच मुख्यमंत्री राहतील.
BMC मध्ये मोठा खेळ! भाजप-शिवसेनेला कोट्यावधींचा निधी, ‘मविआ’च्या आमदारांना ‘शून्य’ रुपये

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज