आम्हाला विश्वास … एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील ; उदय सामंत

आम्हाला विश्वास … एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील ; उदय सामंत

Uday Samant Said Eknath Shinde Will Take DCM Oath : राज्यात आज महायुतीचा शपथविधी पार पडतोय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही? हा प्रश्न अजूनही कायम आहे. तर महायुतीच्या शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत देखील एकनाथ शिंदे यांचं नाव नाहीये. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी महत्वाचं विधान केलंय.

महायुतीचं सुत्र ठरलं! मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख आली समोर, शिंदे-पवारांना किती खाती मिळणार?

माध्यमांसोबत बोलताना उदय सामंत (Maharashtra CM) म्हणाले की, दोन महत्त्वाच्या विषयांसाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आमची स्पष्ट भूमिका आहे की, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत. त्यासोबत उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे व्हावेत, अशी आमची काल आणि आज सुद्धा हीच मागणी आहे. आमच्या इतर सर्व आमदारांपैकी कोणीही उपमुख्यमंत्री होणार नाही. एकनाथ शिंदे यांनीच उपमुख्यमंत्री व्हावे, ही आमची मागणी आणि ते होतील असे सकारात्मक आहेत.

मी ‘काडतूस’ आहे…झुकेगा नही! फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री, चित्रा वाघ यांनी विरोधकांना डिवचलं

माझ्या नावाने एक बातमी पाहिली की शिवसेना मर्ज होणार आहे. म्हणून एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री (Maharashtra Politics) व्हावे, असे फडणवीस म्हणाले आहेत. पण ही चुकीची बातमी आहे. शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठी ही बातमी केली असेल. हे अतिशय वाईट असल्याचं सामंतांनी म्हटलंय. प्रेशर करायचा असता तर शिंदे साहेबांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेतली नसती, असं देखील त्यांनी स्पष्ट केलीय.

मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील ते शासनाच्या फॉरमॅटमध्ये असतात. आम्ही नकारात्मक विचार करत नाही. आम्ही आमची मागणी शिंदे साहेबांना कळवली आहे. आज एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, याची आम्हाला खात्री आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांना विनंती केली की, तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून आज शपथ नाही घेतली तर आम्ही कोणीही आमदार शपथ घेणार नाही. तुम्ही उपमुख्यमंत्री झालाच पाहिजे, ही आम्ही आग्रही मागणी केली. आम्हाला विश्वास आहे की, एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube