मी ‘काडतूस’ आहे…झुकेगा नही! फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री, चित्रा वाघ यांनी विरोधकांना डिवचलं
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी
Chitra Wagh X Post On Devendra Fadnavis : राज्यात आज संध्याकाळी महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यामुळे भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यावेळी भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलेली एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
अजितदादांच्या नावावर नवा रेकॉर्ड; सलग सहाव्यांदा घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
चित्रा वाघ यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, मी काडतूस आहे, झुकेगा नही. ‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे घर मत बसा लेना, मै समंदर हूं, वापस आऊंगा’, असं तो म्हणाला, तेव्हा त्याची खिल्ली उडवली गेली. पण आज हा समुद्रासारख्या विशाल अंतःकरणाचा, समुद्राएवढ्या कर्तृत्वाचा, समुद्राइतकी वैचारिक खोली असणारा देवाभाऊ (Devendra Fadnavis) परत आलाय, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
महायुतीत मंत्रिपदावरून घोडं अडलं? आज फक्त तिघांचाच शपथविधी, कारण…
‘आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, (Maharashtra CM) आम्ही चक्रव्यूह भेदणं जाणतो’, असं हा आधुनिक अभिमन्यू म्हणाला, तेव्हा त्याची चेष्टा झाली, पण त्यानं कावेबाजांचा, कुटिल कारस्थानांचा चक्रव्यूह भेदला. असा काही भेदला, की त्यातून उडालेल्या तेजाच्या किरणांनी भल्याभल्यांचे डोळे दीपून गेले. कुरुक्षेत्रावरचं युद्ध खूप जटिल, अवघड असणार आहे, हे या अभिमन्यूला माहीत आहे. पण त्याला कर्तृत्वाची कवचकुंडलं मिळाली आहेत. ती घेऊन सर्वशक्तिनिशी तो परत आलाय.
मी ‘काडतूस’ आहे…झुकेगा नही !
‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे घर मत बसा लेना, मै समंदर हूं, वापस आऊंगा’, असं तो म्हणाला, तेव्हा त्याची खिल्ली उडवली गेली… पण आज हा समुद्रासारख्या विशाल अंतःकरणाचा, समुद्राएवढ्या कर्तृत्वाचा, समुद्राइतकी वैचारिक खोली असणारा देवाभाऊ परत आलाय.… pic.twitter.com/KwtG7WMWdD
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 5, 2024
‘मी पुन्हा येईन’ असं देवाभाऊ म्हणाला, तेव्हा त्याच्याविरुद्ध पाच वर्षं सातत्यानं कटकारस्थानांचे डोंगर रचले गेले; पण तो परत आलाय!!! परत आलाय गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. ‘देवाभाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है’ असं म्हणणारा देवाभाऊ पाच वर्षांआधी जे बोलला, ते त्यानं करून दाखवलंय दोस्तों आणि जे नाही बोलला, ते ‘डेफिनेटली’ करण्यासाठी आता परत आलाय.
‘फडतूस नाही, काडतूस आहे. झुकेगा नही घुसेगा साला’ असं देवेंद्र फडणवसी म्हणाले होते. त्यांनी ‘फडतूस’ लोकांना ‘काडतूस’ बनून पाताळात गाडलं. आता ‘झुकण्या’साठी नाही, तर ‘घुसण्या’साठी फडणवीस परत आले आहेत. देवाभाऊचा पाच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा काळ हा महाराष्ट्राच्या विकासाच्या इतिहासातला सगळ्यात सोनेरी कालखंड होता. त्यानंतर अडीच वर्षं फडणवीस विरोधी पक्षनेता बनून कुटिल लोकांवर तुटून पडल्याचं देखील चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस पुन्हा परत आले आहेत. त्यांचा पिक्चर संपलेला नाही. उलट आता अॅक्शनन् भरपूर असा पिक्चर असणार आहे. कुणी तरी त्यांच्या पिक्चरचं नाव ‘अकेला फडणवीस’ असं ठेवलं होतं. परंतु चौदा कोटी जनतेने त्यांना पुन्हा एकदा हिरो बनवलं आहे. तमाम महाराष्ट्राचा लाडका, जिगरबाज, चाणक्यनितीत तरबेज, बहिणींचा पाठिराखा, शेतकऱ्यांचा सच्चा साथी, वंचितांचा खांदा असं वर्णन त्यांनी फडणवीसांचं केलंय.