‘जय हिंद, कोड पाठवा…’ थेट राष्ट्रपतींच्या नावाने मेसेज, बनावट फेसबुक अकाउंट तयार करून फसवण्याचा प्रयत्न

‘जय हिंद, कोड पाठवा…’ थेट राष्ट्रपतींच्या नावाने मेसेज, बनावट फेसबुक अकाउंट तयार करून फसवण्याचा प्रयत्न

Jharkhand Scammers Create Fake Facebook Profile Of President Droupadi Murmu : देशात सध्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात (Cyber Fraud) वाढलंय. फसवणूक करुन खात्यावरील पैसे काढल्याची अनेक प्रकरण समोर आली आहे. सोशल मीडियावर लोकांची बनावट खाते (Fake Facebook Profile) काढून फसवणूक केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. सेलिब्रेटी आणि उच्च पदांवर असलेले अधिकारी, राजकारणी नेते (Droupadi Murmu) यांच्याशिवाय इतर लोकांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते काढून घोटाळे केले जात आहेत. आताही असंच एक प्रकरण समोर आलंय.

मोठी घडामोड! अजितदादा २४ तासांपासून नॉट रिचेबल; पडद्यामागं काय घडतंय?

गुन्हेगारांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावाने बनावट खाते तयार केलंय. काही दिवसापूर्वी झारखंड येथील रहिवासी असलेल्या मंटू सोनी या फेसबुक वापरकर्त्याला अशाच एका खात्यातून फ्रेंड रिक्वेस्टची नोटीफिकेशन (Jharkhand Scammers) मिळाली. या प्रोफाइलचे वापरकर्ता नाव, प्रोफाइल फोटो आणि तपशील राष्ट्रपतींचं होतं.

थोडी खुशी, थोडा गम! सामना जिंकून न्यूझीलंडच्या खेळाडूला विजयी निरोप

मंटूला ‘राष्ट्रपती’च्या नावाने एका अकाउंटवरून मेसेज आला होता, “जय हिंद, कसे आहात?” यानंतर प्रोफाईलमागील वापरकर्ता म्हणाला, मी फेसबुक क्वचितच वापरतो. मला तुमचा व्हॉट्सॲप नंबर द्या. मंटूने त्याचा नंबर दिला. काही तासांनंतर, फेसबुक मेसेंजरवर एक संदेश आला की, “आम्ही तुमचा नंबर सेव्ह केलाय. तुम्हाला तुमचा व्हॉट्सॲप कोड पाठवला आहे, जो तुमच्या व्हॉट्सॲपवर जाईल. कृपया आम्हाला कोड पटकन पाठवा, तो 6 अंकी क्रमांक आहे. यानंतर मंटूला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. मंटूने राष्ट्रपती भवन, झारखंड पोलीस आणि इतरांना X टॅगिंगवर या घटनेची माहिती शेअर केली.

या प्रकरणाची रांची पोलिसांनी तात्काळ दखल घेत फेसबुक पोस्टचे सर्व तपशील मागवले. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलीय. रांचीचे एसएसपी चंदन सिन्हा यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत. एजन्सींना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नसल्याची माहिती एसएसपी चंदन सिन्हा यांनी दिली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube