‘डॉक्टर हे देवाचं रुप..,; राष्ट्रपती Droupadi Murmu यांचं विधान
Droupadi Murmu : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांपासून राष्ट्रपती मुर्मू(Droupadi Murmu) नागपुरात आहेत. या दौऱ्यादरम्यान, मुर्मू यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अमृत महोत्सवाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमादरम्यान, बोलताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, डॉक्टरांना देवाचं रुप मानल जातं कारण डॉक्टर लोकांना नवीन जीवन देत असतात, डॉक्टर ही आपल्या देशाची संपत्ती असल्याचं विधान त्यांनी केलं आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती होती.
कोण कोणाच्या चादरीत मला माहित, योग्य वेळी पिक्चर रिलीज करेल; खासदार विखेंचा लंकेंना टोला
पुढे बोलताना मुर्मू म्हणाल्या, नागपूर हे महाराष्ट्राचं प्रमुख शिक्षणाचं केंद्र आहे. या ठिकाणी देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मध्य प्रदेश, तेलंगणासारख्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात. शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून गोरगरीबांना सेवा प्रदान केली जाते. वैद्यकीय सेवा सुलभ असणं हे चांगल्या समाजाचं लक्षण आहे. कोरोना काळात आरोग्य यंत्रणेचं महत्व किती हे आपल्याला समजलं. कोरोना काळात लसीकरणामध्ये डॉक्टर आणि परिचारकांचं महत्वपूर्ण योगदान लाभलं असल्याचं मुर्मू म्हणाल्या आहेत.
Kangana Ranaut: ‘महिलांना पुरुषांची गरज असते…’, कंगनाच्या लक्षवेधी पोस्टने वेधल्या अनेकांच्या नजरा
देशात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली आहे. वैद्यकीय सेवेत असमानतेची एक समस्या आहे या समस्येचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. देशातील गोरगरीब जनता वैद्यकीय लाभ मिळवू शकत नाहीत. त्यासाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. आरोग्य सुविधेसाठी आयुष्मान भारत हेल्थ कार्डाच्या मदतीने कोणत्याही व्यक्तीची माहिती मिळू शकणार असल्याचंही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या आहेत.
फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक, चव्हाणांनी कधीही आरक्षण देण्याचा विचार….; बावकुळेंनी सुनावलं
तसेच डॉक्टरांना देवाचं रुप मानल जातं कारण डॉक्टर लोकांना नवीन जीवन देत असतात, डॉक्टर ही आपल्या देशाची संपत्ती आहे. डॉक्टरांवर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मन लावून ज्ञान धारण करुन लोकांची सेवा करावी, असा सल्ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांचं आवर्जून कौतूक केलं आहे. आमटे यांनी दुर्गम भागातील आदिवासींवर वैद्यकीय सेवा दिली आहे. विविध आजारांविषयी देशातील जनतेमध्ये आरोग्य यंत्रणेने जनजागृती करावी, एआयच्या मदतीने वैद्यकीय समस्या जाणून घेण्यासाठी नवीन दिशा मिळणार आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सज्ज रहावं, लोकांची सेवा करण्यासाठी नेहमीच प्रयत्न रहायला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.