फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक, चव्हाणांनी कधीही आरक्षण देण्याचा विचार….; बावकुळेंनी सुनावलं

  • Written By: Published:
फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक, चव्हाणांनी कधीही आरक्षण देण्याचा विचार….; बावकुळेंनी सुनावलं

Chandrasekhar Bawankule : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसत संघर्ष पेटला. एकीकडे मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेते जरांगे यांच्या मागणीला विरोध करत आहेत. अशातच कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आमचं सरकार असतं, तर तेव्हाच आरक्षणाचा प्रश्न सुटला असता असं वक्तव्य केलं. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) जोरदार प्रत्युत्तर दिलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे खरे जनक असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार सर्वप्रथम फडणवीसांनीच केला.

Miss Malini : ब्लॉग ते बॉलीवूड मिसमालिनीने 15 वर्षांचा झाला मालिनी अग्रवालचा एंटरटेनमेंटमधील प्रवास 

मागील गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत असल्याचे दिसून येते. मराठा समाजाला आरक्षण देण्यात महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे अपयशी ठरल्याची टीका बावनकुळे यांनी होती. आता पुन्हा एकदा त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर आरोप केले आहेत. चव्हाण केलेले वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार पृथ्वीराज चव्हाण यांनी कधीच केला नाही. तो विचार सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनी केला होता, असं ते म्हणाले.

Miss Malini : ब्लॉग ते बॉलीवूड मिसमालिनीने 15 वर्षांचा झाला मालिनी अग्रवालचा एंटरटेनमेंटमधील प्रवास 

ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदा केला. पण मराठा समाज आर्थिकदृष्ट्या कसा दुर्बल आहे, हे मांडण्यात नतद्रष्टे अपयशी ठरले. जेव्हा हे प्रकरण अंतिम टप्यात होते, तेव्हा हे नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री झोपले होते का, असा सवालही बावनकुळेंनी केला.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सर्वपक्षीय बैठकीत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यावर एकमत झाल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

मी मुख्यमंत्री असताना 2014 मध्ये सहकार क्षेत्रात घेतलेल्या निर्णयांमुळे राष्ट्रवादीने आमचे सरकार पाडले. त्यावेळी आमचे सरकार पडले नसते तर नक्कीच आम्ही मराठा आरक्षण टिकवून ठेवले असते, असं चव्हाण म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्यभर रान पेटले आहे. मराठा आंदोलनाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्याआधीच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, यासाठी आता समाजाकडून सरकारवर दबाव वाढत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube