Miss Malini : ब्लॉग ते बॉलीवूड मिसमालिनीने 15 वर्षांचा झाला मालिनी अग्रवालचा एंटरटेनमेंटमधील प्रवास

Miss Malini : ब्लॉग ते बॉलीवूड मिसमालिनीने 15 वर्षांचा झाला मालिनी अग्रवालचा एंटरटेनमेंटमधील प्रवास

Miss Malini : मालिनी अग्रवाल उर्फ ​​​​मिस मालिनी (Miss Malini ) हिने नुकतीच तिची मनोरंजन उद्योगातील 15 वर्ष पूर्ण केली. याच औचित्य साधून तिने एक खास पार्टी देखील ठेवली होती. जुहू येथे एका जंगी आणि आकर्षक पार्टीमध्ये अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. एंटरटेनमेंट क्षेत्रातील तीचा प्रवास 15 वर्षांचा झावला आहे. हा प्रवास नक्कीच अफलातून आहे. त्यामुळे हा खास क्षण साजरा करण्यासाठी तिचे अनेक जवळचे मित्र-मैत्रिणी एकत्र आले होते.

Chhattisgarh Election : छत्तीसगडमध्ये भुपेश बघेल यांच्यासह ‘या’ नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत

वर्षानुवर्षे मिसमालिनी एंटरटेनमेंट क्षेत्रात कायम चर्चेत राहिली आहे. या उद्योगातील तिचं योगदान हे अमूल्य असून अनेक इनरून्सर्स आणि सेलिब्रिटींसोबत तिचं मजबूत नेटवर्क आहे. तर डिसेंबर 2021 मध्ये, गुड ग्लॅम ग्रुपने, दक्षिण आशियातील सर्वात मोठा ब्युटी ब्रँड मिसमालिनीने विकत घेतला. गुड ग्लॅम ग्रुपची स्थापना कंटेंट-निर्माता-कॉमर्स-कम्युनिटी रायव्हीलवर झाली आहे. मालिनी अग्रवाल तिच्या कामाने सगळयांना प्रेरित करते. तर तिच्या सेलिब्रेशन पार्टीमध्ये तिचा पार्टनर डॉन ज्युलिओने उत्सव वाढवला होता.

Exit Poll 2023 Rajsthan : भाजपला दिलासा अन् टेन्शनही; Exit Poll चा अंदाज काय?

मालिनी अग्रवाल, नौशाद रिझवानुल्ला आणि माईक मेली, मिसमालिनी एंटरटेनमेंटचे संस्थापक म्हणतात, “आम्ही मिसमालिनी लाँच केली तेव्हा आमचा दृष्टीकोन होता की, असे काहीतरी ग्राउंडब्रेकिंग आणि प्रभावशाली ब्रॅंड निर्माण करायचा. एक नवीन टेक असलेला स्वदेशी ब्रँड जो भारतीयांचा मार्ग बदलेल. त्यामुळे आमच्या ब्लॉगमध्ये आम्ही जीवनशैली आणि मनोरंजन कथा सांगितल्या आणि शेअर केल्या.

Exit Poll 2023 : मध्य प्रदेशमध्ये काँटे की टक्कर; सहापैकी या एक्झिट पोलने दिली बरोबरीची आकडेवारी

Facebook आणि Twitter वर एकत्रित 1000 फॉलोअर्स आम्ही अशा भविष्याचे स्वप्न पाहिले आहे. जिथे प्रामाणिकता, सकारात्मकता आणि मनापासून तयार केलेली डिजिटल सामग्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जाईल. प्रेक्षक आणि जाहिरातदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसे आकर्षक होईल. आमच्या अतुलनीय कार्यसंघ सदस्य, गुंतवणूकदार आणि ब्रँड भागीदारांपासून ते सर्व प्रचंड प्रतिभावान लोक आणि व्यक्तिमत्त्वांपर्यंत ज्यांनी आमचे स्वप्न सत्यात बदलण्यास मदत केली. अशा असंख्य समर्थकांचे आम्ही खूप आभारी आहोत. आणि अर्थातच, आमचे चाहते आणि फॉलोअर्स ज्यांनी हे सर्व शक्य केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube