Exit Poll 2023 : मध्य प्रदेशमध्ये काँटे की टक्कर; सहापैकी या एक्झिट पोलने दिली बरोबरीची आकडेवारी

election results of four states namely Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh and Telangana will be announced today

Exit Poll 2023 : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Exit Poll 2023) रविवारी जाहिर होणार आहेत. त्या अगोदर जाहिर होणाऱ्या एक्झिट पोलची लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. त्यामध्ये आज 30 नोव्हेंबरला तेलंगणामध्ये 119 जागांसाठी अखेरचे मतदान पार पडले. त्यानंतर लगेचच एक्झिट पोलची आकडेवारी समोर येऊ लागली आहे. त्यामध्ये मध्यप्रदेशमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचं चित्र आहे.

अमित शाह ठरले फेल, छत्तीसगडमध्ये पुन्हा कॉंग्रेसचीच मुसंडी? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

कारण सहापैकी तीन एक्झिट पोलने भाजप आणि कॉंग्रेसला बरोबरीची आकडेवारी दिली आहे. त्यामुळे हे अंदाज खरे ठरले तर मध्यप्रदेशमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये काँटे की टक्कर होईल आणि स्पष्ट बहुमत कोणालाही मिळणार नाही. त्यामुळे द्विधा परिस्थिती निर्माण झाली तर इतर पक्ष आणि अपक्षांचं महत्त्व वाढेल. त्यांचा निर्णय सरकारस्थापनेमध्ये मोठी भूमिका पार पाडणार आहे. मध्यप्रदेशात मायावतींचा बसपा आणि अखिलेश यादवांचा सपा देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र एक्झिट पोलने या दोन्ही पक्षांना शून्य आकडेवारी दाखवली आहे. त्यामुळे असंच झालं तर काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

एक्झिट पोलची आकडेवारी समोर…

पोलस्ट्रॅट – कॉंग्रेस – 111 ते 121 , भाजप- 106 ते 116, इतर – 00 ते 06

आज तक अ‍ॅक्सिस – कॉंग्रेस – 111 ते 121 , भाजप- 106 ते 116, इतर – 00 ते 06

मॅट्रीझ – कॉंग्रेस – 97 ते107 , भाजप- 118 ते 130, इतर – 00 ते 02

जन की बात – कॉंग्रेस – 102 ते 125 , भाजप- 100 ते 123, इतर – 00 ते 05

चाणक्य – कॉंग्रेस – 74 (कमी-अधिक 12) , भाजप- 151 (कमी-अधिक 12), इतर – 05 (कमी-अधिक 4)

सीएनएक्स – कॉंग्रेस – 111 , भाजप- 116, इतर – 00 ते 03

Exit Poll 2023 Rajsthan : राजस्थानात कमळ की पंजा?; सर्वेक्षणातून निष्कर्ष आले समोर

दरम्यान अनेक एक्झिट पोलमध्ये मध्यप्रदेशमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचं चित्र आहे. तर अनेक एक्झिट पोलमध्ये भाजपला मध्यप्रदेशमध्ये कमी जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील भाजपची सत्ता जाणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यावर भाजप नेत्या आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी एक्झिट पोलमध्ये मध्यप्रदेशची जी आकडेवारी दाखवण्यात आली आहे त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, मी एक्झिट पोलवर विश्वास ठेवत नाही. मला वाटत की, भाजपने मध्यप्रदेशात सरकार स्थापन करावं. मी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा सन्मान करते.

Tags

follow us