मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले नव्हते, आरटीआयमधून उघड
Maratha Reservaition : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservaition) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) येथे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषणाला बसले होते. यावेळी आंदोलन मोडून काढण्यासाठी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर मोठी टीका झाली होती. त्यानंतर त्यांना माफी देखील मागावी लागली होती. पण आता याबाबत नवा खुलासा झाला आहे.
आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले नव्हते, असे या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरटीआयमधून समोर आले आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्रालयही देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांच्या आदेशाशिवाय लाठीचार्ज होऊ शकत नाही, असा प्रश्न विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जात होता.
लाठीचार्जमुळे वादात सापडलेल्या दोषींना सीआयडीची जबाबदारी, पुण्यातील दोन अधिकारी विदर्भात
आसाराम डोंगरे यांनी आरटीआय दाखल केला होता
फडणवीसांवर होत असलेल्या आरोपांवर आता उत्तर सापडले आहे. आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले नव्हते. आरटीआय कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी महाराष्ट्र पोलिसांकडे आरटीआय अंतर्गत माहिती मागवली होती की, देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर हा लाठीचार्ज झाला का? जालना पोलीस अधीक्षक कार्यालयाने आरटीआयच्या उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले नव्हते.
Maratha Reservation : धाराशिवमध्ये जरांगे पाटलांच्या सभांवर पोलिसांची कारवाई; नेमकं कारण काय?
जालन्यात हिंसाचार उसळला
दरम्यान, जरांगे पाटील जेव्हा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले होते तेव्हा आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर राज्यात मोठा हिंसाचार उसळला होता. जालन्यातील लाठीचार्ज घटनेचे प्रकरण अजूनही तापले आहे. जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाबाबत पूर्वी सातत्याने उपोषणाला बसले होते, आता ते महाराष्ट्रभर सभा घेत आहेत.