कोण कोणाच्या चादरीत मला माहितीये, योग्य वेळी पिक्चर रिलीज करेल; खासदार विखेंचा लंकेंना टोला
अहमदनगर – आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. यातच नेतेमंडळी टीका टिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाही. (Ahmednagar Politics) आता खासदार सुजय विखेंनेही (Sujay Vikhe) विरोधकांवर जोरदार टीका केली. सध्या कोणत्या बँकेत कोणाचे खाते आहे, रात्री –अपरात्री कोण कुठे जात असतं, कोण कोणाच्या चादरीत, हे सगळे मला माहिती आहे. माझ्याकडे याचे सर्व व्हिडिओ देखील आहे, योग्य वेळी पिक्चर रिलीज करेल, अशा शब्दात विखेंनी नाव न घेता विरोधकांना ठणकावलं. तसेच माझी खासदारकी ही जनता ठरवेल काही चार – पाच पुढारी माझं भवितव्य ठरवू शकत नाही, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
Dunki Song Release: शाहरुख खानच्या ‘डंकी’ सिनेमातील ‘निकले थे कभी हम घर से’ गाणं रिलीज
नगर तालुक्यातील पोखर्डी व कापुरवाडी येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी खासदार विखे बोलत होते. खासदार सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. यावेळी बोलताना विखेंनी आगामी निवडणुकांवर देखील भाष्य केले, तसेच आपल्या भाषणातून त्यांनी पुन्हा एकदा लंके व शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
यावेळी बोलताना विखे म्हणाले, लोकसभा लढवण्यास इच्छुक असलेल्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी देखील निवडणूक लढवली पाहिजे, कारण मी काही बिनविरोध तर विजयी होणार नाही. मात्र कोण उभं राहणार मला याच काही घेणं देणं नाही. मी माझ्या कामावर मत मागणार आहे. कोणाचं खात कोणत्या बँकेत आहे. कोण कोणाच्या घरी रात्री अपरात्री जात असतो, याचे व्हिडीओ देखील माझ्याकडे आहे. हा गोपनीय अहवाल आहे. मी आपल्या छाननी समितीकडे पाठवतो मग त्यांनी ठरवायचं कि कधी कोणता पिक्चर रिलीज करायचा, असा टोला देखील विखे यांनी लगावला.
‘ते’ पुन्हा राजकारणात उभे राहणार नाहीत
माझ्यावर टीका केली तरी मी चिडणार नाही. मी यांचे सगळे पुरावे गोळा केले आहे. फक्त एकदा यांना निवडणुकीत उभे राहू द्या. हे परत कधी आयुष्यात राजकारणात उभे राहणार नाही, हे पण तुम्हाला आजच सांगतो. आमच्याकडे सगळ्यांची शूटिंग आहे. कोण कोणाच्या चादरीत आहे हे मला माहित. यामध्ये अनेक मातब्बर आहेत, त्यामुळे आरोप करतांना जपून करा, झाकली मूठ सव्वा लाखाची…
अनेक लोक आवश्यकतेपेक्षा जास्त पळत आहेत. ते पळतपळत एवढं लांब जातात कि, त्यांना माझे घर देखल सापडत नाही. तर ते जिथं पोहचता, तिथं घर बनवता, असे देखील काही प्रतिनिधी आहेत. त्यामुळे मी जी काही विकासकामे माझ्या कारकीर्दीत केली आहेत, ती जनतेसमोर मांडणार आणि मग या जिल्ह्यातील गोर गरीब जनताच ठरवेल की पुढील खासदार कोण असणार? खासदार कोण होणार हे चार-पाच पुढारी ठरवू शकत नाहीत.