Dunki Song Release: शाहरुख खानच्या ‘डंकी’ सिनेमातील ‘निकले थे कभी हम घर से’ गाणं रिलीज

Dunki Song Release: शाहरुख खानच्या ‘डंकी’ सिनेमातील ‘निकले थे कभी हम घर से’ गाणं रिलीज

Dunki Song Release Out : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ (Dunki) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील ‘निकले थे कभी हम घर से’ (Nikle Te Kabhi Hum Ghar Se) हे गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. या नव्या गाण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

शाहरुख खान 2023 मध्ये ‘डंकी’च्या माध्यमातून तिसऱ्यांदा धमाका करण्यासाठी सज्ज आहे. वर्षाच्या शेवटी किंग खानचा सिनेमा चाहत्यांना भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने डंकीचा फर्स्ट ड्रॉप शेअर केला होता. आता ड्रॉप 2 देखील चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ‘डंकी’ सिनेमातील ‘निकले थे कभी हम घर से’ या गाण्यात शाहरुख खान, तापसी पन्नूची झलक बघायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही तरुण दिसत आहेत. किंग खान आणि तापसी पन्नूच्या रोमँटिक केमिस्ट्रीने चाहत्यांचा लक्ष वेधून घेतलं आहे.

शाहरुखने ‘डंकी’ या सिनेमाच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आता फक्त सिनेमाची प्रतीक्षा, पठाण, आणि जवाननंतर आता डंकी करणार धमाका, डंकीसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत, किंग खानला जलवा, अशा कमेंट्स चाहते करत असल्याचे दिसत आहेत.

Bigg Boss 17: आधी भांडण अन् आता प्रेम…; अंकिता लोखंडे विकी जैन ठरले ‘परफेक्ट पार्टनर’

शाहरुखचा आगामी ‘डंकी’ हा सिनेमा रिलीज आधीपासूनच जोरदार चर्चेत आहे. या सिनेमात तापसी पन्नू आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत असणार आहेत. ‘डंकी’ हा बहुचर्चित सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. ‘डंकी’ या सिनेमाला U सर्टिफिकेट देण्यात आले आहे. ‘डंकी’ या सिनेमात शाहरुख आणि तापसीसह विकी कौशल, बोमन ईरानी, तापसी पन्नू आणि सलमान खान महत्त्वाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहेत.

शाहरुख खानच्या ‘डंकी’ या सिनेमाची दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत टक्कर होणार आहे. शाहरुखचा ‘डंकी’ 21 डिसेंबरला प्रदर्शित होणार असून प्रभासचा ‘सालार’ 22 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन्ही बिग बजेट सिनेमे असून दोन्ही सिनेमांसाठी सिनेप्रेमी उत्सुक आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कोणता सिनेमा बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube