Bigg Boss 17: आधी भांडण अन् आता प्रेम…; अंकिता लोखंडे विकी जैन ठरले ‘परफेक्ट पार्टनर’
Bigg Boss 17 Latest Episode: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) हे ‘बिग बॉस 17’मध्ये (Bigg Boss) स्पर्धक म्हणून सामील झाले आहेत. एरव्ही रोमँटिक दिसणारी ही जोडी या घरात मात्र एकमेकांशी जोरदार भांडणं करत असल्याचे बघायला मिळत होते. अनेकदा घरात जोरदार वाद होत होते. यात अंकिता आणि विकी यांच्यात जास्त वाद होताना दिसत आहेत. दोघांमधील वाद बघून चाहते देखील अवाक् झाले होते. आता या कपलला घरात ‘आदर्श जोडी’ म्हणून जोरदार बोलबाला होत आहे.
View this post on Instagram
अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे एक उत्तम कपल आहे, यात शंका नाही ही जोडी कायम चर्चेत राहिली आहे. बिग बॉस 17 मध्ये हे एक आदर्श जोडपे म्हणून ओळखले जात आहे. व्यावसायिक कारकिर्दीत हे दोघं एकत्र राहून काम करत आहेत, कायम सोबतीने ही जोडी बिग बॉसच्या घरात कायम चमकत आहे. सध्या बिग बॉस 17च्या घरात अंकिता ही विकीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अंकिताने तिच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओ शेअर करत असताना, अंकिताने त्या व्हिडिओला कॅप्शन देखील दिले आहे. म्हणाली की, जेव्हा तुमचं लग्न तुमच्या जिवलग मित्राशी….तेव्हा त्यांचा अर्थ असा होतो. पुढे अंकिता म्हणाली की, ‘विकी कामात असला तरी वेळ काढून मुंबईत येतो. तेच काही दिवस आम्ही एकत्र असतो. नाहीतर बाकी दिवस आम्ही एकमेकांपासून वेगळे राहतो. आमच्यात जेव्हा भांडण होतं तेव्हा विकी सगळ्यात अगोदर आणि जास्त चिडतो. पण तितकीच लगेच त्याची समजूत काढता येते.
महाराष्ट्राच्या अलौकिक संत पंरपरेचा इतिहास उलगडणार, ’मुक्ताई’ चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज
‘बिग बॉस 17’च्या मंचावर प्रथमच अंकिता लोखंडेचे खरे व्यक्तिमत्त्व चाहत्यांना पाहायला मिळाले आहे. यावेळी अभिनेत्रीला मोठी पसंती मिळण्याऐवजी ती प्रेक्षकांच्या मनात व्हिलन ठरत होती. तर, दुसरीकडे ती ट्रोल देखील होत आहे. सतत विकी आणि अंकिताची भांडणं पाहून आता प्रेक्षक देखील वैतागले होते. कधी कधी विकीच्या वागणुकीमुळे अंकिताचे चाहते त्यांच्यावर चांगलेच संतापले आहेत. मात्र आता अंकिता लोखंडे आणि विक्की नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे दिसत आहेत.