Ankita Lokhande: बिग बॉस 17च्या घरात अंकिता लोखंडेने तिच्या करिअरबद्दल सांगितली खास गोष्ट

Ankita Lokhande: बिग बॉस 17च्या घरात अंकिता लोखंडेने तिच्या करिअरबद्दल सांगितली खास गोष्ट

Ankita Lokhande On Career: अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) तरुण वयातच मनोरंजन (Entertainment) क्षेत्रामध्ये पदार्पण केले आणि लोकप्रिय टीव्ही सिरीयल “पवित्र रिश्ता” (Pavitra Rishta Serial) मधील अर्चनाच्या भूमिकेने चाहत्यांची मने जिंकली आहे. तिने तिचा पती विकी जैन सोबत बिग बॉस 17च्या (Bigg Boss 17) घरात एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. या पॉवर कपल त्यांच्या अस्सल स्वभावामध्ये बघायला मिळाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)


अंकिताने गेल्या काही दिवसापूर्वी लोकप्रिय रिअॅलिटी शोमधील दुसर्‍या स्पर्धकासोबत तिच्या आजपर्यंतच्या अभिनय कारकीर्दीबद्दल चर्चा करत असल्याचे बघायला मिळाली आहे. अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्याला कॅप्शन दिल आहे. “तिने हे सर्व केले आहे, परंतु ते कधीही सोपे नव्हते ” अंकिताचा हा प्रवास तिच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि आव्हानांचा असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. अंकिता नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री ठरली असून आता ती काय खेळी करणार आहे, हे बघण उत्सुकतेच राहणार आहे.

गेल्या काही दिवसाखाली अंकिता लोखंडे पुन्हा एकदा लगीनगाठ बांधली आहे. अंकिताने तिचा पती विकी जैनबरोबर ख्रिश्चन पद्धतीने पुन्हा एकदा लगीनगाठ बांधली आहे. एका व्हिडीओत विकी हा रोमँटिक पद्धतीने गुडघ्यावर बसून अंकिताला प्रपोज करताना दिसत आहे. यानंतर ते दोघेही एकमेकांना लिप किस करतानाही पाहायला मिळालं होत.

Dunki Teaser: शाहरुखने वाढदिवशी चाहत्यांना दिलं सरप्राईज; ‘डंकी’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

दरम्यान अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी 14 डिसेंबर 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अंकिता आणि विकी गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. काही दिवसांपूर्वी ती गरोदर असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube