अजितदादांनी जरांगे पाटलांचे कान टोचले; भुजबळांचीही अप्रत्यक्ष भूमिका मांडली…

अजितदादांनी जरांगे पाटलांचे कान टोचले; भुजबळांचीही अप्रत्यक्ष भूमिका मांडली…

Ajit Pawar On Manoj Jarange : मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरन चांगलच वादंग पेटल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांकडून या मागणीचा कडाडून विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनीही या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कर्जतमधील आयोजित कार्यक्रमात अजितदादांनी मनोज जरांगे पाटलांचे कान टोचले आहेत तर छगन भुजबळांचीही भूमिका अप्रत्यक्षपणे मांडल्याचं दिसून आलं आहे. अजितदादांनी छगन भुजबळ यांची भूमिका पुढे नेते महापुरुषांची उदाहरणे दिली असून त्यांनी आपल्या भाषणात कोणाचे नाव न घेता सर्वकाही सांगून दिले आहे.


‘तेरा नाम सुनके’ रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला’; गाण्यातून दिसणार अपारशक्ती-निकिताची ऑनस्क्रीन केमिस्ट्री

अजित पवार म्हणाले, राज्यातील कुणबी शेती करणारे आहेत. आपले पोरं शिकले पाहिजेत, हे प्रत्येकाला वाटतं पण दुसऱ्यांची पोरं शिकू नयेत, असं वाटायला नको. राज्यात आज चिथावणी करणारे भाषणे केली जात आहेत. चिथावणी करणारे भाषणे तत्काळ थांबले पाहिजेत, या चिथावणी करणाऱ्या भाषणांमुळे दंगली घडल्या तर कोण जबाबदार आहे? असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Mizoram Election : मिझोरममध्ये ना भाजप, ना कॉंग्रेस; सत्ता पालट होऊन ZPM ची सत्ता येणार?

छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातला हाच महाराष्ट्र का?
छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं आहे. मात्र, राज्यात आज काय सुरु आहे? सध्या जाती-जातीत भांडणे उभी राहत आहेत, हे दुर्देवी असून हाच शिवरायांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आहे का? अवघ्या देशात पहिले आरक्षण महाराष्ट्रात लागू झाले. अहिल्याबाई होळकर यांनी देशात अनेक कामे केली. पण त्या लोकांनी कधी जात पाहिली नाही, या शब्दांत अजितदादांनी सुनावलं आहे.

15th International Kudo Tournament: खिलाडी अक्षय कुमारसह आंतरराष्ट्रीय कुडो स्पर्धेत दिसली दिशा पटानी

दरम्यान, जातीचा अभिमान जरु जपा. पण इतर जातीसंदर्भात द्वेष मनात ठेऊ नका. एखादा समाजाचा प्रश्न सोडवत असताना इतरांवर अन्याय होणार नाही, याची काळजी आपणास घ्यावी लागणार आहे. एखादा समाजाचे मागासलेपण काळानुसार झाले असेल तर ते तपासण्यासाठी वेळ लागतो, हे लक्षात घ्या, या शब्दांत अजितदादांनी जरांगेंना सुनावलं आहे. तसेच मराठा समाजातील आरक्षण देताना इम्पेरिकल डाटा महत्वाचा आहे. त्याशिवाय आरक्षण टिकत नाही यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. यामुळे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube