Mizoram Election : मिझोरममध्ये ना भाजप, ना कॉंग्रेस; सत्ता पालट होऊन ZPM ची सत्ता येणार?
Mizoram Election Exit Polls: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपले असून आता निकाल 3 तारखेला घोषित केले जातील. याआधी विधानसभा निवडणूक 2023 च्या एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार मिझोरममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंटला (Zoram People’s Movement) राज्यात मोठा विजय मिळत आहे. पक्षाला 28 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. सध्याचे मुख्यमंत्री झोरामथांगा (Chief Minister Jhoramthanga) यांच्या मिझो नॅशनल फ्रंटला (Mizo National Front) केवळ 3 ते 7 जागा मिळतील असा अंदाज आहे.
‘शरद पवार संधी असूनही शेवटच्या क्षणी माघारी फिरतात’; पटेलांनी इतिहासाचा पाढाच वाचला
मिझोरममध्ये विधानसभेच्या 40 जागा आहेत. आणि सत्ता स्थापनेसाठी 21 जागांची गरज आहे. मिझोरम नॅशनल फ्रंट (MNF) आणि झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) यांच्यात काटे कि टक्कर दिसून येत आहेत. दरम्यान, 7 नोव्हेंबरला मतदान झाले. या निवडणुकीत 8.57 लाख नागरिकांनी मतदान केले. सरासरी राज्यात 77 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत एमएनएफ आणि प्रमुख विरोधी पक्ष झेडपीसह कॉंग्रेस सर्व 40 जागांवर निवडणुक लढवली. तर भाजपने 23 आणि आम आदमी पक्षाने 4 जागांवर आपले उमेदवार उभे कले.
रिपब्लिक टीव्ही-जन की बात’च्या एक्झिट पोलनुसार-
ZPM – 15 ते 25 जागा
MNF 10 ते 14 जागा
काँग्रेसला – 5 ते 9 जागा
भाजपला – 0 ते 2 जागा
पोल स्टार्ट एक्झिट पोल-
ZPM – 15 ते 25 जागा
MNF – 10 ते 14 जागा
काँग्रेस- 5 ते 9 जागा
भाजप- 0 ते 2 जागा
Miss Malini : ब्लॉग ते बॉलीवूड मिसमालिनीने 15 वर्षांचा झाला मालिनी अग्रवालचा एंटरटेनमेंटमधील प्रवास
सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार
ZPM- 12 ते 18 जागा
MNF- 15 ते 21 जागा
काँग्रेस- 2 ते 8 जागा
भाजप- 0 ते 0 जागा
सीएनएक्सच्या एक्झिट पोलमध्ये
एमएनएफ १४ ते १८ जागा
झेडपीएम १२ ते १६ जागा
काँग्रेस ८ ते १० जागा
भाजपला २ जागा
सीएनएक्स एक्झिट पोलमध्ये
MNF – 14 ते 18 जागा
ZPM – 12 ते 16 जागा
काँग्रेसला- 8 ते 10 जागा
भाजपला – 2 जागा
2018 ची स्थिती काय?
2018 च्या विधानसभा निवडणुकीत झोरमथांगाच्या पक्षाने 10 वर्षांचा वनवास संपवून सत्तेत परतला. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत, मिझोरामच्या मिझो नॅशनल फ्रंट आणि त्याचे अध्यक्ष झोरामथांगा यांनी मिझोराम विधानसभा निवडणुकीत 28 जागा जिंकून जोरदार पुनरागमन केले होते.