‘तेरा नाम सुनके’ रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला’; गाण्यातून दिसणार अपारशक्ती-निकिताची ऑनस्क्रीन केमिस्ट्री

‘तेरा नाम सुनके’ रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला’; गाण्यातून दिसणार अपारशक्ती-निकिताची ऑनस्क्रीन केमिस्ट्री

Aparshakti Khurana New Song: आतापर्यंत बॉलिवूडमध्ये (Bollywood) हिरोच्या मित्राची भूमिका म्हणजे काहीशी दुय्यम भूमिका मानली जायची. इतर भूमिकांच्या तुलनेत नेहमीच कमी महत्त्वाची ही भूमिका ठरली पण अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana) असं काढिती मानत नाही. आतापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटात अपारशक्ती सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये बघायला मिळाला आहे. नुकतच त्याच ‘तेरा नाम सुनके’ हे नवं गाणं चाहत्यांच्या भेटीला आले आहे. (Tera Naam Sunke Song) या पूर्वी “कुडिये नी” या गाण्याने त्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hitz Music (@hitz.music.official)


या गाण्याला आतापर्यंत 25 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळवून हे गाणं आजही तितकच ट्रेंडमध्ये बघायला मिळत आहे. अपारशक्तीचे ‘तेरा नाम सुनके’ हे गाणं एक हृदयस्पर्शी गीत आहे, हे गाणं अभिनेत्री निकिता दत्ता हिच्या सोबत शूट करण्यात आल आहे. आपल्या नवीन गाण्याबद्दल बोलत असताना अपारशक्ती म्हणाला की, मला वाटते की मी वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी करतोच आहे आणि अजून नवनवीन काम करण्याचा प्रयत्न करत राहणार आहे. ज्युबिलीसाठी बॅक टू बॅक पुरस्कार जिंकणे बर्लिनच्या सर्व फिल्म फेस्टिव्हलमध्ये तोंडभरून कौतुक करण्यात आलं होते.

पुढे म्हणाला की, होस्टिंग , गाणी या सगळ्या गोष्टी मला आनंद देऊन जाणाऱ्या आहेत. माझ्या म्युझिक प्रोजेक्ट् सिंगल “कुडिये नी” ला इंस्टाग्राम आणि स्पॉटिफाईवर खूप प्रेम मिळाल्यानंतर आता हे नवं गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहे. मी लिहिलेलं हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे, यात काही शंका नाही, अशी प्रतिक्रिया त्याने यावेळी दिली आहे.

Hemangi Kavi : ‘झिम्मा 2’च्या अभिनेत्रींसाठी हेमांगी कवीची खास पोस्ट; म्हणाली, “आता हा खेळ…”

‘तेरा नाम सुनके’ चाहत्यांना अपारशक्ती खुराणा यांच्या संगीत प्रवासाची अनोखी झलक दाखवणार आहे, आणि अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळविलेल्या ‘बर्लिन’ या चित्रपटाच्या यशानंतर अपारशक्ती उंच भरारी घेत असल्याचे दिसत आहे. “बर्लिन”मधील त्याच्या अभिनयाने त्याच्या पात्रांना जीवंत केलं. “ज्युबिली” या वेब सिरीजचे लेखक अतुल सबरवाल यांनी “बर्लिन”चे दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. इश्वाक सिंग, राहुल बोस आणि कबीर बेदी देखील मुख्य भूमिकेत आहेत. अपारशक्ती अॅप्लाज एंटरटेनमेंटच्या सहकार्याने “फाइडिंग राम” या माहितीपटाद्वारे चाहत्यांना अनोखी पर्वणी देणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube