विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे ३ उमेदवार निश्चित
पुणे : मागच्या आठवड्यात जाहीर झालेल्या विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोकण शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने विधानपरिषदेच्या ५ जागांपैकी ३ उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. कोकण शिक्षक मतदारसंघातून बलराम पाटील, नाशिक शिक्षक मतदारसंघातून सुधीर तांबे आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून विक्रम काळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. उर्वरित नागपूर आणि अमरावती या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची यावर चर्चा सुरु आहे.
अशी आहे निवडणूक प्रक्रिया :-
निवडणुकीची अधिसूचना – ५ जानेवारी
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – १२ जानेवारीपर्यंत
अर्ज माघारी घेण्याची मुदत – १६ जानेवारीपर्यंत
मतदान – ३० जानेवारी
मतमोजणी – २ फेब्रुवारी रोजी होणार आहे.