Sujay Vikhe : नगर दक्षिण लोकसभा (Nagar South Lok Sabha)सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)व भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांनी एकत्र वाहनातून प्रवास करत मोहटादेवीच्या (Mohatadevi)दर्शन घेतले. यावर खासदार सुजय विखे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी विखे म्हणाले, त्या दोघांनी एकत्र प्रवास केला हा सर्व महाराष्ट्राने पहिला आहे. यावरून महायुती किती बळकट आहे हे सगळ्या राज्याने पाहिले आहे. आज महायुती खऱ्या अर्थाने यशस्वी झाली असेल तर ती नगरमध्ये झाली आहे असा टोलाही यावेळी विखे यांनी आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde)यांना लगावला आहे.
Video : ‘आय विश’ म्हणत राज्यातील ड्रग्ज कारवाईत समीर वानखेडेंची एन्ट्री; फडणवीसांवरही केले भाष्य
राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके व भाजपचे आमदार राम शिंदे यांनी नुकतेच एकाच वाहनातून मोहटादेवीच्या दर्शन केले. यावर खासदार सुजय विखे यांना प्रश्न विचारण्यात आला. सुजय विखे हे मोहटादेवी गडावर दर्शनासाठी आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार विखे म्हणाले, त्या दोघांनी एकत्र प्रवास केला हा सर्व महाराष्ट्राने पहिला आहे. यावरून महायुती किती बळकट आहे हे सगळ्या राज्याने पहिले आहे. आज महायुती खऱ्या अर्थाने यशस्वी झाली असेल तर ती नगरमध्ये झाली आहे याचे हे एक उत्तम उदाहरण आहे अशा शब्दात खासदार सुजय विखे यांनी आपल्याच पक्षातील आमदार राम शिंदे यांना शाब्दिक टोला लगावला आहे.
भाजप म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा…; तत्कालीन मंत्र्याची यादी देत सुळेंचा फडणवीसांना टोला
तसेच पुढे बोलताना विखे म्हणाले, अजित पवार यांनी घेतलेला निर्णय तसेच एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आणि फडणवीस यांनी घेतलेला निर्णय याची अगदी काटेकोरपणे कोठे अमलबजावणी झाली आहे ती म्हणजे पाथर्डी येथील मोहटादेवी यांच्या या पावनभूमी येथे होय असेही यावेळी बोलताना विखे म्हणाले. यामुळे आता मला पूर्णपणे विश्वास आहे की, जो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तीन लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून येणार होता. आता तो अधिक मताधिक्याने निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशा शब्दात विखे यांनी राम शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
शिंदेंची भूमिका ठरतेय विखेंनी डोकेदुखी
शारदीय नवरात्रोत्सव सुरु असून सध्या या अनुषंगाने राजकीय नेत्यांकडून लोकसभेची मोर्चेबांधणी सुरु आहे. आगामी नगर दक्षिण लोकसभा चांगलीच गाजणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. लोकसभेसाठी खासदार सुजय विखे तयारी करत असताना त्यांना पक्षातूनच एक धक्का बसला आहे. भाजपचे आमदार राम शिंदे यांनी आपल्याला लोकसभा लढण्याची इच्छा जाहीरपणे बोलवून दाखवली. यातच राष्ट्रवादीकडून आमदार निलेश लंके यांचे देखील नाव चर्चेत आहे.
भरात भर म्हणजे नुकतेच राम शिंदे यांनी आमदार निलेश लंके यांच्यासोबत मोहटादेवी दर्शन केले. यामुळे भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. यामुळे आता पक्षातील कलह वरिष्ठ पातळीवर कसा सोडवला जाणार? तसेच विखेंचा आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रवास सुखकर होणार का? याकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.