Video : ‘आय विश’ म्हणत राज्यातील ड्रग्ज कारवाईत समीर वानखेडेंची एन्ट्री; फडणवीसांवरही केले भाष्य

  • Written By: Published:
Video : ‘आय विश’ म्हणत राज्यातील ड्रग्ज कारवाईत समीर वानखेडेंची एन्ट्री; फडणवीसांवरही केले भाष्य

मुंबई : राज्यात सध्या ललित पाटीलमुळे (Lalit Patil) ड्रग्ज तस्करीचा मुद्दा चांगलाच गाजत असून, आता यात मध्यंतरीच्या काळात शाहरूख खानाच्या (Shahrukh Khan) मुलावर कारवाई केलेल्या समीर वानखेडेंची (Sameer Wankhede) एन्ट्री झाली आहे. सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत त्यांनी भाष्य करत मत व्यक्त केले आहे. या सर्व प्रकरणात काही राजकारण्यांची नावे समोर येत असल्याचे आपल्या वाचनात आल्याचे वानखेडे म्हणाले. गृह खात आणि राज्य सरकारकडून करण्यात येत असलेली कारवाई योग्य असल्याचेही ते म्हणाले. तसेच अशाचप्रकारे ही कारवाई पुढेदेखील सुरू ठेवावी, अशी भावनादेखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. (Sameer Wankhede On Lalit Patil Drug Case)

कॉंग्रेस सोबत घेत नाही म्हणून भाजप आशेवर असेल, तर त्यांनी वाटच बघावी; आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये ड्रग्जचं प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत असल्याचेही चित्र आहे. त्यामुळे गृहखात आणि राज्य शासनाकडून जी कारवाई करण्यात आली आहे योग्य असून भविष्यातही अशाच प्रकारच्या कारवाई सुरू ठेवणे आवश्यक आहे. सध्या मी एनसीबीमध्ये कार्यरत नाहीये त्यामुळे यावर अधिक बोलणे योग्य ठरणार नाही. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मार्गदर्शनामध्ये यावर योग्य कारवाई केली जाईल आणि अनेक गोष्टी समोर येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. एनसीबीला कार्यरत असतानाद मोठ्या प्रमाणात अशाप्रकारच्या कारखान्यांवर आम्ही कारवाई केल्याचे यावेळी वानखेडेंनी सांगितले.

ललित पाटील प्रकरणात उद्धव ठाकरे आरोपीच्या पिंजऱ्यात

पुण्यातील ससून रूग्णालायतून पळ काढलेल्या ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या (Lalit Patil) मुसक्या आवळल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) काल (दि.20) पत्रकार परिषदेत अनेक प्रश्न उपस्थित करत राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या प्रकरणात अजून खूप खोलात जायचे असल्याचे सांगत त्यांनी ललित पाटीलबाबत ठाकरे गटाला समोर ठेवत अनेक खुलासे केले आहेत.

Udhav Thackery : …तर बॉम्बस्फोटावेळी दाऊद भाजपाध्यक्ष असल्या सारखं; ललित पाटील प्रकरणी ठाकरेंचा निशाणा

अजून खोलात जायचे आहे

ललित पाटील याला 10 नोव्हेंबर 2020 रोजी अटक झाली. त्या काळात उद्धव ठाकरेंनी त्याला नाशिक शिवसेनेचा प्रमुख केले होते. त्याला अटक ज्या गंभीर गुन्ह्यात झाली, त्यामुळे 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. पण, त्याला लगेच ससूनमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे त्याची चौकशीच झालेली नाही. त्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी पुन्हा न्यायालयात अर्ज सुद्धा करण्यात आला नाही. त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आणि त्याचा मुक्काम ससूनमध्येच राहिला. या गुन्हेगाराची साधी चौकशी सुद्धा झालेली नाही. यासाठी कुणी दबाव आणला? तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी की गृहमंत्र्यांनी? आणखी बर्‍याच गोष्टी आहेत. पण, आज त्या सांगणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.याप्रकरणात अजून खूप खोलात जायचे बाकी असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube