Download App

ज्या कालव्याचे काम पूर्णच झालेले नाही, त्याचे लोकार्पण कसे? निळवंडेवरुन तनपुरेंचा सवाल

Prajakt Tanpure On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi)आज शिर्डी (Shirdi)दौऱ्यावर आले आहेत. उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणासह विविध प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान निळवंडे धरणाच्या (Nilavande Dam)मुद्द्यावरून आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)यांनी सरकारवर तसेच मोदींवर निशाणा साधला आहे. निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण करण्यासाठी मोदी शिर्डीत येत असल्याचे समजले. मुळात ज्या कालव्याचे काम पूर्णच झालेले नाही, त्याचे लोकार्पण कसे? लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections)पार्श्वभूमीवर श्रेय लाटण्याचे काम सुरू आहे का? असा सवाल यावेळी तनपुरे यांनी केला आहे.

Nitesh Rane : सदावर्तेंची गाडी फोडणारे काल मातोश्रीवर होते; राणेंचा गंभीर आरोप

तनपुरे नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अहमदनगर जिल्ह्यात स्वागत करतो. निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण करण्यासाठी ते येत असल्याचे समजले. मुळात ज्या कालव्याचे काम पूर्णच झालेले नाही, त्याचे लोकार्पण कसे? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रेय लाटण्याचे काम सुरू आहे का? हे प्रश्न निळवंडे धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पडले आहेत.

Sonali Kulkarni : अप्सरेचा गुलाबी साडीतला हटके लूक

गेल्या काही महिन्यांपासून धरणाच्या उजव्या कालव्याचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी मी स्वतः लाभार्थी शेतकऱ्यांसह आंदोलन करत आहे. अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासने देऊनही वास्तव पाहिल्यास काही भागांतील कामाला सुरुवात झालेली नाही.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी योग्य आर्थिक नियोजन करत या कामाला वेग प्राप्त करून दिला होता. मात्र सत्तापालट झाल्यानंतर 7 ते 8 महिने हे काम ठप्प होतं. यात सध्याच्या सरकारची उदासीनता दिसून येते.

शासन आपल्या दारी या कार्यक्रमाप्रमाणेच आजही गोरगरिबांची इतर कामे सोडून अधिकारी वर्ग कार्यक्रमस्थळी नेत्यांची तैनात करण्यात व्यस्त आहेत. एसटी बसेस तिथे वळविल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे देखील हाल सुरू आहेत. असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

दरम्यान मोदी आज शिर्डीला आले आहे त्यांच्या कार्यक्रमाला गर्दी जमावी यासाठी मोठी तयारी करण्यात आली. गावपातळीवरून बसची सोय देखील करण्यात आली होती. मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज बांधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत या स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका समाजाने घेतली. आज मोदींच्या सभेसाठी जाणाऱ्या बसच्या काचा फोडण्यात आल्या, ही घटना शेवगाव तालुक्यात घडली तर जामखेडमध्ये नागरिकांअभावी बस या रिकाम्याच निघाल्या.

follow us