Download App

Sushama Andhare : नगरमध्ये सुषमा अंधारेंच्या फोटोला फासलं काळं, नेमकं कारण काय?

Sushama Andhare : मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation)मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. ते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. नुकतेच शिवसेना (ठाकरे गटाच्या) (Shivsena Thackeray Group)नेत्या सुषमा अंधारे यांनी जरांगे पाटील यांच्याविषयी केलेल्या विधानावरून नगर (Ahmednagar)शहरात सुषमा अंधारेंच्या फोटोला काळे फासण्यात आले. यावेळी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

Ajit Pawar : अमित शाहांकडे कोणाचीही तक्रार केली नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयीं टीका टिपणी केली. त्यांच्या या वक्तव्यचा निषेध म्हणून सकल मराठा समाजाच्यावतीने नगर शहरातील दिल्ली गेट परिसरात अंधारे यांच्या प्रतिकात्मक फोटोला काळे फासले. तसेच यावेळी त्यांच्याविरोधात निदर्शने तसेच जोरदार घोषणाबाजी केली.

तिरुअनंतपुरममध्ये भारत कांगारुंशी भिडणार, जाणून घ्या पिच रिपोर्ट…

अंधारे नेमकं काय म्हणाल्या होत्या?
मराठा आरक्षणवरून सध्या राज्यात राजकारण तापलेलं आहे. यावर काही राजकीय नेत्यांकडून समर्थन केले जात आहे, तर काहींकडून टीका टिपणी केली जात आहे. यातच ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट मनोज जरांगे यांना खोचक शब्दात टोला लगावला होता.

एकीकडे मागास म्हणता तर दुसरीकडे आडनावापुढे पाटील लावतात, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी खोचक टोला लगावला आहे. तर मागास म्हणवून 100 जेसीबीतून फुलांची उधळण करतात? असा खोचक सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. सुषमा अंधारे यांच्या टीकेवर आता सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज