Download App

अहमदनगरचा पाणी पुरवठा होणार विस्कळीत

अहमदनगर : अहमदनगर शहरात महावितरणकडून शनिवारी 4 फेब्रुवारीला महत्त्वाच्या यांत्रिक दुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे अहमदनगर शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील पाणी पुरवठा तीन दिवस विस्कळीत राहणार आहे. अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

महावितरण कंपनीकडून मुळा धरण परिसरातील फिडर दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी शटडाऊन घेण्यात आला आहे. यावेळेत महापालिकेकडून अमृत पाणी पुरवठा योजनेची महत्त्वाची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेकडून पाणी उपशाचे काम बंद राहणार असल्याने शहरातील पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाहीत.

सावेडी उपनगर, बोल्हेगाव, नागापूर, मुकुंदनगर, सारसनगर, केडगाव, नगर- कल्याण रस्ता परिसरात शनिवार ऐवजी रविवारी (ता. 5) पाणी पुरवठा होईल. शहराचा मध्यवर्ती भाग, लालटाकी, सिद्धार्थनगर, सावेडीचा काही भाग, स्टेशन परिसर, आगरकरमळा, विनायकनगर आदी भागांत रविवार (ता. 5) ऐवजी सोमवारी (ता. 6) पाणी पुरवठा होईल. मंगलगेट, झेंडीगेट, धरती चौक, दाळमंडई, प्रेमदान चौक, म्युनिसीपल हाडको आदी भागांत सोमवार (ता. 6) ऐवजी मंगळवारी (ता. 7) पाणी पुरवठा होईल, असे उपायुक्त डांगे यांनी सांगितले.

Tags

follow us