Water Supply Will Be Disturbed : महावितरण व विद्युत पारेषण प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी विद्युत तारांची दुरुस्ती केली जाते. त्यासाठी शनिवारी (ता. १०) महावितरण(MSEB) प्रशासनाकडून शटडाऊन (Shutdown) घेण्यात येणार आहे. त्यामुळे अहमदनगर (Ahmednagar) शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Ahmednagar water supply will be disturbed)
विद्युत पारेषण कंपनीकडून शनिवारी (ता. १०) सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत नगर-राहुरी विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या शटडाऊनमुळे या कालावधीत महापालिकेकडून ‘अमृत’ पाणी पुरवठा योजनेची महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
Sharad Pawar : शरद पवारांनी संभाजीनगर असा उल्लेख केला तरी भाजपने फेक ट्विट केलं
दरम्यानच्या काळात विळद परिसरातील मुळानगर येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी वितरण करणार्या टाक्या भरल्या जाणार नाहीत. शनिवारी (ता. १०) सकाळी १० वाजेनंतर पाणी पुरवठा होणार्या भागाला रविवारी (ता. ११) पाणी पुरवठा होईल तर रविवारी (ता. ११) पाणी पुरवठा होणार्या भागाला सोमवारी (ता. १२) पाणी पुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.