Sharad Pawar : शरद पवारांनी संभाजीनगर असा उल्लेख केला तरी भाजपने फेक ट्विट केलं

Sharad Pawar : शरद पवारांनी संभाजीनगर असा उल्लेख केला तरी भाजपने फेक ट्विट केलं

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बुधवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी औरंगाबाद असा उल्लेख केला, पण त्यानंतर लगेचच त्यांनी संभाजीनगर म्हणतो वाद वाढवायचा नाही, असं विधान केलं. त्यानंतर भाजपकडून पवारांविरोधात एक फेक ट्विट करण्यात आलं. (Sambhajinagar mentioned by Pawar but fake tweet by BJP)

मी छत्रपती संभाजीनगर नाहीतर औरंगाबादच म्हणणार असल्याचे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. त्यावर भाजपने ट्वीट करत पवारांना खोचक सवाल केला आहे. तुम्हाला औरंग्याचा इतका पुळका का? असा खोचक सवाल भाजपने ट्विटमध्ये केला आहे.

पहाटे 3 वाजताच्या फ्लाईटसाठी आलेले प्रवासी 10 तासांपासून पुण्याच्या विमानतळावरच! संतप्त जमावाचा ठिय्या

प्रत्यक्षात मात्र, पवार असे म्हणाले नाहीत. ते आपल्या भाषणात म्हणाले की, माझ्या एका सहकाऱ्याच्या इच्छेनुसार समृद्धी महामार्गावरून औरंगाबादला आलो आहे. संभाजीनगर म्हणतो, मला वाद वाढवायचा नाही. समृद्धी महामार्गाला किती शेतजमीन गेली आहे ते पाहा. देशातील लोकसंख्या वाढत आहेत. तर जमीन कमी होत असल्याचे पवार आपल्या भाषणात म्हटले आहे.

Sujay Vikhe : समनापूरमधील दगडफेकीवर सुजय विखेंची प्रतिक्रिया; ‘म्हणाले ही दंगल…’

या विधानावर भाजपकडून एक ट्विट करण्यात आलं असून तुम्ही मतांसाठी इतके लाचार झाला की औरंग्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा अपमान करीत असल्याची सडकून टीका करण्यात आलीय.

तसेच हे राज्य हा देश छत्रपती शिवाजी राजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा आहे, त्यामुळे तुम्हाला औरंग्याचा इतका पुळका का? असा खोचक सवाल करीत पवारांच्या विधानावर बोट ठेवलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube