पहाटे 3 वाजताच्या फ्लाईटसाठी आलेले प्रवासी 10 तासांपासून पुण्याच्या विमानतळावरच! संतप्त जमावाचा ठिय्या

पहाटे 3 वाजताच्या फ्लाईटसाठी आलेले प्रवासी 10 तासांपासून पुण्याच्या विमानतळावरच! संतप्त जमावाचा ठिय्या

Pune Airport Passanger Protest :  पुणे एअरपोर्टवर एयर आशिया ची flight पुणे to बंगलोर जाणारी सकाळी ५ ची flight दुपार पर्यंत एअरपोर्टला आली नाही. नागरीक सकाळी ५ च्या flight साठी पहाटे ३ पासून एअरपोर्टवर आले आहेत. यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. जो पर्यंत आमची flight येत नाही तो पर्यंत एक ही flight आम्ही जाऊ देणार नाहीं अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.

या प्रकारामुळे प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घालत विमान कंपनीचा निषेध केला. जयपूरच्या विमानाला विलंब झाल्याने 4 नंबरच्या गेटवर आंदोलन करणाऱ्या तीन प्रवाशांना सी आय एस एकच्या जवानांनी ताब्यात घेतले. यावेळी त्या प्रवशाला थेट उचलून नेण्यात आले.

सकाळी साडेपाच वाजता विमान असल्यामुळे प्रवासी पहाटे विमानतळावर आले होते. विमान वेळेवर न आल्यामुळे अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला. काही प्रवाशांना दवाखान्यात जायचे होते, कोणाला मीटिंगला तर काहींना मुलाखतीसाठी जायचे होते. पण या सर्व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. जवळपास 10 तास हे सर्व प्रवासी विमानतळावर अडकले होते.

Dr. Gaurav Gandhi : सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्टलाच ह्रदयविकाराचा झटका; 41 व्या वर्षी जगाचा निरोप

यानंतर विमान कंपनीने अखेर दुपारी 2.55 वाजताचे जयपूरला जाणारे विमान बंगळुरुला पाठवण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रवाशांनी विमानतळावरी अधिकाऱ्यांशी जोरदार वाद घातला. जयपूचे विमान बंगळुरुला पाठवल्याने जयपूरचे प्रवासी रखडले. अखेर जयपूरच्या प्रवाशांनी भुवनेश्वरला जाणारे विमान जयपूरला सोडण्याची मागणी केली. पण जयपूरला 5.30 शिवाय विमान नसल्याचे सांगण्यात आले. एकंदरीतच विमानतळावर संपूर्ण गोंधळ पहायला मिळाला.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube