Dr. Gaurav Gandhi : सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्टलाच ह्रदयविकाराचा झटका; 41 व्या वर्षी जगाचा निरोप

Dr. Gaurav Gandhi : सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्टलाच ह्रदयविकाराचा झटका; 41 व्या वर्षी जगाचा निरोप

Dr. Gaurav Gandhi : हजारो रुग्णांच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया करुन नवीन आयुष्य देणारे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट गौरव गांधी स्वत:ला ह्रदयविकाराच्या झटक्यापासून वाचवू शकले नाहीत. डॉ. गौरव गांधी यांनी आत्तापर्यंत 16 हजार रुग्णांना नवीन आयुष्य दिलं आहे. मात्र, सोमवारी रात्री गौरव गांधी यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते 41 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. (Dr. Gaurav Gandhi died of a heart attack)

Odisha Train Accident: जनसामान्यांचा हिरो पुन्हा मदतीला धावून आला..सोनू सूदची अपघातग्रस्तासाठी नवी मोहीम!

सोमवारी डॉ. गौरव गांधी रु्ग्णांना तपासल्यानंतर नेहमीप्रमाणे घरी आले. आपल्या कुटुंबियांसोबत त्यांनी रात्रीचं जेवण केल्यानंतर झोपण्यासाठी गेले. सकाळी कुटुंबातील सदस्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं दिसलं.

Nawazuddin Siddiquiच्या पहिल्या बायकोची मिस्ट्री मॅनसोबत रोमँटिक फोटो; चाहते म्हणाले… 

त्यानंतर कुटुंबियांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यांना जी. जी रुग्णालयातील एमर्जन्सी वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. अखेर ४५ मिनिटांनी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अद्याप अहवाल आलेला नाही.

New Mumbai Airport : उद्घाटन PM मोदींच्या हस्ते होणार; पाहणी करताना CM शिंदेंनी केली ‘मन की बात’

डॉ. गांधी यांनी वैद्यकीय कारकिर्दीत त्यांनी १६ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया केलीय. ते जामनगरमधील बडोदा हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये मुख्य कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत होते. ह्रदयविकाराच्या आजारापासून आपला बचाव करण्यासाठी ते सर्वसामान्य नागरिकांना पद्धती शिकवत असत.

‘जागरूक राहा, आपण चुकलो तर जनता’.. शरद पवारांचा आघाडीच्या नेत्यांना इशारा

त्यांच वैद्यकीय शिक्षण जामनगरमध्येच झालं असून त्यांनी अहमदाबादमधून कार्डिओलॉजिस्टमध्ये स्पेशलायझेशन केलं, त्यानंतर जामनगरधील बडोदा हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये मुख्य कार्डियोलॉजिस्ट म्हणून सेवा बजावत होते.

दरम्यान, डॉ. गांधी यांच्या पत्नी देवांशी यादेखील दंतचिकित्सक असून प्रजासत्ताकदिनी डॉ. गांधींचा वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube