Nawazuddin Siddiquiच्या पहिल्या बायकोची मिस्ट्री मॅनसोबत रोमँटिक फोटो; चाहते म्हणाले…
Nawazuddin Siddiqui : बॉलिवूडमध्ये कोणाचं नाव कधी कोणाला जोडलं जाईल काय सांगता येत नाही. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पहिल्या बायकोच्या खासगी आयुष्याबद्दल तुफान चर्चा रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) त्याच्या सिनेमांमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत येत आहे. आता देखील एका मोठ्या कारणामुळे अभिनेता जोरदार चर्चेत आला आहे. (Social media) गेल्या काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकी याची पहिली बायको आलिया सिद्दीकी (Alia Nawazuddin) हिने अभिनेत्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.
View this post on Instagram
नवाज याच्यापासून विभक्त झाल्यावर आलिया तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. सोशल मीडियावर आलियाने एका मिस्ट्री मॅनसोबत फोटो पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीचे त्या फोटोची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत असताना कॅप्शनमध्ये, ‘ज्या नात्याला मी स्वीकारलं होतं, त्या नात्यातून बाहेर येण्यासाठी मला १९ वर्ष लागली आहेत. पण आयुष्यात मुलं माझी जबाबदार आहेत आणि कायम राहतील.. काही नाती मैत्रीपेक्षा जास्त असतात आणि मी प्रचंड आनंदी आहे. आम्ही एकत्र आयुष्याचा आनंद घेत आहोत.. मला आनंदी राहण्याचा हक्क नाही का?’ असे तिने यावेळी लिहिले आहे.
आलियाच्या पोस्टवर चाहते देखील मोठ्या प्रमाणात कमेंट करत निशाणा साधला आहे. आलियाच्या पोस्टवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तू आडनाव बदलून घे…’ तर दुसऱ्याने, ‘प्रत्येकाला आनंदी राहण्याचा हक्क आहे…’ असं कमेंटमध्ये सांगितले आहे. तसेच आलियाच्या पोस्टवर नेटकरी लाईक्स आणि जोरदार कमेंटचा वर्षाव करत आहेत. दरम्यान बायकोसोबत असलेल्या भांडणांमुळे नवाजुद्दीन सिद्दीकी कायद्याच्या कचाट्यामध्ये देखील अडकला होता.
Box Office Collection : ‘जरा हटके जरा बचके’चा दबदबा, चित्रपटानं पाचव्या दिवशी केली कोटींची कमाई
आता नवाजुद्दीन सिद्दीकी याची पहिली बायको आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) हिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आलियाचा फोटो पाहिल्यावर अभिनेत्याच्या चाहत्यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. मुलांच्या कस्टडीवरून नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियामध्ये मोठा वाद सुरू होता. हा वाद कोर्टात गेल्यावर आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर घरगुती हिंसाचार झाला आणि तिच्या मुलांना वाईट वागणूक दिली जात असल्याचे आरोप लावण्यात आले आहेत.
दरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप करत आलियाने अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले होते. व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर करत आलियाने अनेक प्रश्न देखील उपस्थित केले होते. या प्रकरणावर नवाजुद्दीन कधीच कोणाला काही बोलला नाही. मुलांच्या योग्य संगोपनासाठी त्यांची कस्टडी हवी आहे… एवढंच अभिनेता म्हणाला. शिवाय आलिया आणि मी गेल्या अनेक दिवसांपासून विभक्त राहत आहोत, यावर देखील अभिनेताने भाष्य केले होते.