Download App

विरोधकांच्या खिचडीचा उपयोग काय? अजित दादांकडून मोदींचं कौतुक, विरोधकांना टोले

Ajit Pawar in Shasan Aaplya Dari : समोरचे विरोधक फक्त आरोप करायचे. त्यात मुख्यमंत्री दोन तीन दिवस आजारी होते. ते काळजी घेत होते. पण विरोधक त्यातही वावड्या उठवत होते. कुठे फोडाल ही पापं. मोदींना विरोध करण्यासाठी देश पातळीवर सगळे एकत्र आले आहेत. सगळ्यांनी एकत्र येत खिचडी केली आहे. त्या खिचडीचा काही उपयोग आहे का?

सत्तेसाठी अनेकांनी विचारांशी फारकत घेतलीय; जयंत पाटलांचं टीकास्त्र

अहमदनगर जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज शिर्डी येथे पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मोठे मंत्री, आमदार, खासदार उपस्थित आहेत. यावेळी बोलताना विरोधकांच्या आघाडीवर टीका केली. अजित पवारांनी राज्यातील राजकारणावर टीका केली.

काय म्हणाले अजित पवार?

सत्ता येत असते, सत्ता जात असते ताम्रपट घेऊन कोणीच जन्माला आलेलं नाही. पण सत्ता राबवताना आपले मुख्यमंत्री जपानला चालले आहेत. ते काही मजा करालायला नाही तर गुंतवणूक आणण्यासाठी चालले आहेत. त्यातून तरूणांना रोजगार मिळावा. त्यासाठी ते चालले आहेत. समोरचे विरोधक फक्त आरोप करायचे. त्यात मुख्यमंत्री दोन तीन दिवस आजारी होते. ते काळजी घेत होते. पण विरोधक त्यातही वावड्या उठवत होते. कुठे फोडाल ही पापं.

आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे; पवारांचं वय काढणाऱ्या अजितदादांना सलगर भिडल्या

राजकारण करायचं तर सरळ मार्गी करा कुठल्या थराला आज राजकारण चालंल आहे. हे प्रकार महाराष्ट्राला पुढे नेणारे नाही. याची नोंद नगरकरांनी घ्यावी. देश पातळीवर मोदींशिवाय कोणताही नेता नाही. त्यांना विरोध करण्यासाठी देश पातळीवर सगळे एकत्र आले आहेत. सगळ्यांनी एकत्र येत खिचडी केली आहे. त्या खिचडीचा काही उपयोग आहे का? कोणताही तालूका तेव्हा पुढे जातो. जेव्हा तेथे एका नेत्याच्या नेतृत्त्वाखाली काम केलं तर तो पुढे जातो. तिथे 10 लोकांनी डोके घातले तर काहीच घडत नाही.

त्याच प्रमाणे मोदींच नेतृत्त्व जगाने मान्य केलं आहे. त्यांच्या कौतुकामध्ये देश आणि जनतेचं कौतुक होतं. त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत. पण फक्त आरोप-प्रत्यारोप करून काय मिळवणार आपण? असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर टीका करत. मोदींवर मुक्तफळं उधळली.

नागरिकांना कुटुंब नियोजनाचाही सल्ला दिला…

प्रपंच चांगला चालला पाहिजे घर मिळालं पाहिजे अशा सर्वांची इच्छा असते. मात्र माझी एक विनंती आहे. दोन आपत्यांवर थांबा. लोकसंख्येच्या बाबतीत आता आपण चीनला ही मागे टाकलं आहे. जमीन एवढीच आहे. मुळा आणि भंडारा यापेक्षा मोठी धरण आता बांधता येत नाही. त्यामुळे लोकसंख्येच्या बाबतीत आपण व्यवहारिक विचार करायला पाहिजे असा सल्ला अजित पवारांनी नागरिकांना दिला.

Tags

follow us