आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे; पवारांचं वय काढणाऱ्या अजितदादांना सलगर भिडल्या

  • Written By: Published:
आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे; पवारांचं वय काढणाऱ्या अजितदादांना सलगर भिडल्या

बीड : अजितदादांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत दोन गट तयार झाले असून, शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीला पुन्हा उभारी देण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार केला आहे. याचाच एक भाग म्हणून आज (दि. 17) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बालेकिल्ल्यात पवारांची स्वाभिमान सभा पार पडली.  यावेळी अनेक नेत्यांची भाषणं झाली. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर उघडपणे बोलण्याची हिंम्मत दाखवली ती राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी. पवारांच्या वयावरून केलेल्या विधानाचा त्यांनी समाचार घेत अजितदादांचे कवितेचे बोल म्हणत कान टोचले.

‘आम्ही, चांगल्या चांगल्यांना छातीवर घेतलंय’; जितेंद्र आव्हाडांनी बीडच्या सभेत फोडली डरकाळी

सलगर म्हणाल्या की, मी लहानपणापासून ऐकलय पवारसाहेबांचा बालेकिल्ला बीड जिल्हा. पण, आता सगळे पवारसाहेबांच वय काढतात, पण एका कवीने लिहून ठेवलय की, “आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. विचार बाकी आहे” असे बोल म्हणत सक्षणा सलगर यांनी अजितदादांवर हल्ला केला आहे.

65 वर्षाचा सह्याद्री आम्ही असा तसा रिटायर होऊ देणार नाही

पुढे बोलताना सक्षणा सलगर (Sakshana Salgar) म्हणाल्या की, पवार साहेब आम्ही तरुण मंडळी असून, हे रणांगण आहे. या रणांगणात तरुणांची संख्या जास्त आहे. तरुण का भारवला आहे? 65 वर्षाचा सह्याद्री आम्ही असा तसा रिटायर होऊ देणार नाही असेही सलगर म्हणाल्या. गुजरात महाराष्ट्राला चालवत असेल, तर आम्ही ते सहन करणार नाही असा सज्जड दमही त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिला.

PM Vishwakarma Yojana : कारागिरांसाठी मोदी सरकारने आणले ‘अच्छे दिन’; जाणून घ्या योजना

वय काढतं काय म्हणाले होते अजितदादा

राष्ट्रवादीत बंडखोरी करत अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांसोबत जाणे पसंत केले. त्यानंतर मुंबईत एमईटी येथे बोलताना अजितदादांनी थेट पवारांचे वय काढले होते. आता वय 82 झालं, 83 झालं तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? तुम्ही आशिर्वाद द्या असे म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांकडून अजित पवारांवर टीका करण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून… : फडणवीसांचा इशारा

एखादा माणूस सरकारी नोकरीत लागला तर 58 व्या वर्षी निवृत्त होतो. आयएस, आयपीएस असेल तर साठाव्या वर्षी निवृत्त होतो. राजकीय जीवनात असा तर भाजपामध्ये (BJP) 75 व्या वर्षी निवृत्त केलं जातं. आता नवीन पिढी पुढे येतेय, आता तुम्ही आशिर्वाद द्या ना असे म्हणत तुम्ही चूक लक्षात आणून द्या, चूक मान्य करत दुरुस्त करुन पुढे जाऊ असेही अजित पवार म्हणाले होते. तुम्ही शतायुष्य व्हा, असे म्हणत माझी काय चूक? मला का नेहमी जनतेसमोर व्हिलन करता असा सवालही अजित पवारांनी केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube