Download App

अजित पवार मुख्यमंत्री होणार? रोहित पवारांनी भर कार्यक्रमातच सांगितलं

अहमदनगर : आज आपण सामाजिक हितातून शाळेतील विद्यार्थांना (Schools Students)आपण सायकल वाटप करत आहोत. असे सांगत असताना सुरुवातीलाच आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar)सर्वांना उन्हाचे चटके बसत असल्याने उपस्थितांकडे दिलगिरी व्यक्त केली. ते आज एवढ्या उन्हामध्ये आपल्याला बसावे लागत आहे. आणि त्यामुळे आम्हीही उन्हातच आहोत. उन्हामुळे आपण हा कार्यक्रम थोडक्यात उरकणार असल्याचे आमदार रोहित पवारांनी सांगितले. यावेळी बोलत असताना आमदार रोहित पवारांनी येत्या काळात आपण सर्वजण राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांना राज्याच्या उच्च पदावर बसताना आपणा सर्वांना त्यांना पाहायचंच आहे ते आपण पाहूच, असे म्हणाले. यातून एक प्रकारे आमदार रोहित पवारांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा यावेळी बोलून दाखवली.

त्यामुळे काही दिवसांपूर्वी अजित पवार हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील अशी जोरदार चर्चा होती. पण त्यावर थेट आमदार रोहित पवारांच्या अशा वक्तव्यानं आता त्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. रोहित पवार म्हणाले की, आपल्या भाषणानंतर काही मुलांना प्रातिनिधिक स्वरुपात सायकलचे वाटप केले जाणार आहे. आणि त्यानंतर लगेच अजित पवार बोलतील, त्यामुळे आपण थोडसे सहन कराल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

चंद्रकांत खैरे थकलेले नेते, त्यांना टार्गेट करू नका; शिरसाटांनी मेळाव्यातच सांगितले..

खरंतर अजित पवार हे माजी उपमुख्यमंत्री आणि आज राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. त्याचबरोबर ते माझे काका आहेत म्हणून फक्त त्यांना याठिकाणी बोलवलं असं नाही, अजित पवारांचे कार्य राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं आहेच. येत्या काळात आपण सर्वजण त्यांना राज्याच्या उच्च पदावर बसताना आपणा सर्वांना त्यांना पाहायचंच आहे ते आपण पाहूच, असे म्हणत आमदार रोहित पवारांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा यावेळी बोलून दाखवली.

रोहित पवार म्हणाले की, अजित पवारांचं शैक्षणिक काम खूप मोठं आहे. विद्या प्रतिष्ठाणच्या माध्यमातून 35 ते 40 हजार मुलामुलींना पुणे जिल्ह्यात शिक्षण दिलं जातं. त्यात कर्जत-जामखेडची अनेक मुलं मुली त्यात आहेत. इंजिनिअरींग, लॉ, बायोटेक्नॉलॉजी असेल अशा प्रकारचं उच्च शिक्षण असेल त्यासाठी अनेक विद्यार्थी बारामतीच्या परिसरामध्ये जात असतात. तसेच पुणे जिल्हा शिक्षण महामंडळाच्या माध्यमातून 1 लाखांपेक्षा जास्त मुला-मुलींना शिक्षण दिलं जातं. ही शेतकरी, सामान्य लोकांची, छोटेमोठे व्यवसाय करणारे आहेत. अशांची मुलं-मुली या ठिकाणी शिक्षण घेत आहेत.

त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे डोनेशन घेत नाही. फक्त चांगल्या प्रतिचं शिक्षण मिळण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार 30 ते 40 वर्षांपासून ते शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहेत. त्यांना मी विनंती केली की, माझ्या मतदारसंघातील माझे कुटुंबीय म्हणजेच तुम्ही सर्वजण यांच्यातील होतकरु मुलं मुली आहेत. ज्यांना शाळेसाठी तीन किलोमीटरपर्यंत शाळेला पायी चालत जावं लागतं, त्यांना सायकल द्यायच्या आहेत, आणि तुम्हाला जमेल का? असं विचारलं त्यावर त्यांनी लगेच कर्जत-जामखेडला यायचं असेल तर लगेच येणार असल्याचे मान्य केले, असेही त्यांनी सांगितले.

जर एखादा शैक्षणिक कार्यक्रम असेल, सामाजिक कार्यक्रम असेल तर मी लगेच येईल, असे अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे अजित पवार यांचे याठिकाणी आल्याबद्दल आभारही मानले. यावेळी त्यांनी सांगितले की, सत्तेत असताना अजित पवार यांनी खूप मोठं शैक्षणिक कामे केली. अंगणवाडी सेविकांना 15 हजार मानधन मिळावे, यासाठी एक कमिटी बनवली होती, त्या कमिटीने रिपोर्टही बनवला होता. त्या रिपोर्टला मान्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. अंगणवाडींच्याबाबत कोरोनाच्या काळात अडचण असताना आशाताईंच्या मानधनात वाढ केली.

शैक्षणिक क्षेत्रात अनेक निर्णय घेतले. त्यावेळी निर्णय घेताना माताभगिनींकडे बघितलंच पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागात काम करत असताना महिलांना अनेक अडचणी येत असतात. आणि ते कुणाची सेवा करतात? ते सर्वसामान्यांच्या मुलामुलींची सेवा करतात या हेतूमधून त्यांनी काम केले असेही यावेळी आमदार रोहित पवारांनी सांगितले.

Tags

follow us