चंद्रकांत खैरे थकलेले नेते, त्यांना टार्गेट करू नका; शिरसाटांनी मेळाव्यातच सांगितले..

चंद्रकांत खैरे थकलेले नेते, त्यांना टार्गेट करू नका; शिरसाटांनी मेळाव्यातच सांगितले..

Sanjay Shirsat News : शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केले गेले तर अनेकांना पोटशूळ उठला. पण, मी खात्रीने सांगतो की हा मोर्चा फक्त संभाजीनगर पुरता मर्यादीत नव्हता तर या मोर्चाचे पडसाद राज्यात उमटले. मोर्चा पाहून काही जण आपले स्टेटमेंट आता बदलायला लागले आहेत. आता राज्यातलं वातावरण बदललं आहे. चंद्रकांत खैरे हा थकलेला नेता आहे. त्यांच्यावर टीका करण्यात वेळ वाया घालवू नका, असे आवाहन ठाकरे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना केले.

छत्रपती संभाजीनगर येथे आजोजित शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. शिरसाट यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, आमची 38 वर्षे शिवसेनेत गेली आणि काल आलेली अंधारे नावाची बाई आम्हाला शिकवते. इतकेच काय तर खुद्द ठाकरे गटातील नेत्यांनाच या बाईची अडचण होत आहे, असे मला अंबादास दानवेंनीच सांगितल्याचा दावा शिरसाट यांनी केला.

काँग्रेसकडून राजकारणासाठी आरक्षणाचा वापर; अमित शाहांचे काँग्रेसवर ताशेरे

येत्या 8 एप्रिल रोजी धनुष्यबाण चिन्हाची शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा शहरात होणार आहे. या रॅली आणि सभेच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

हिंदुत्वावर कसे बोलायचे ?

बाळासाहेबांना अपेक्षित असणारी शिवसेना आज कुठे आहे. आज मालेगावला उद्धव ठाकरेंची सभा आहे त्यातील जाहिराती पहा, जनाब अली उद्धव ठाकरे आ रहे है, सगळीकडे बॅनर लावले. आता हिंदुत्वावर कसे बोलायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर आला असेल. आम्ही कुणा जाती धर्माच्या विरोधात नाही. आम्हाला बोलता पण तुमच्या मानगुटीवर कोण बसलंय हे तर पहा आधी ? , शिवसेनाप्रमुखांनी जे निर्माण केले त्यांचे विचार आज तुम्ही कुठे घेऊन चाललात  असे सवाल त्यांनी केले.

‘लोक आता मूर्ख राहिले नाहीत’, बच्चू कडूंच ठाकरेंवर टीकास्त्र


खरे हसले तर आनंदच झाला असता

उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्यावेळी पत्रकारांनी मला विचारले तुम्हाला कसे वाटते. त्यावेळी मी म्हणालो हे पाहण्यासाठीच तर आम्ही उभे राहिलो आहोत. ते त्यावेळी खोटे हसत होते. जर खरेखुरे हसले असते तर आम्हाला सुद्धा आनंदच वाटला असता. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणतात असे शिरसाट म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube