काँग्रेसकडून राजकारणासाठी आरक्षणाचा वापर; अमित शाहांचे काँग्रेसवर ताशेरे
बंगळूरु : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha)आज एक दिवसाच्या कर्नाटक (Karnataka)दौऱ्यावर आहेत. राज्यातील बिदर जिल्ह्यातील गोरटा गावात त्यांनी 103 फूट उंच तिरंगा फडकवला आहे. त्याचबरोबर रायचूरमध्ये त्यांनी विविध प्रकल्पांचे उद्घाटनही केले. यानंतर गृहमंत्री शाह यांनी रायचूरमध्ये निवडणूक रॅलीलाही (Election Rally)संबोधित केले, यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांनी कॉंग्रेसवर (Congress)जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी अमित शाहांनी आरक्षणाचा वापर कॉंग्रेसने निवडणुकांसाठी केल्याचा आरोपही केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी निवडणूक रॅलीला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने अल्पसंख्याकांना दिलेले आरक्षण संविधानानुसार नसल्याचीही टीका यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण (reservation)देण्याची राज्यघटनेत तरतूद नाही असेही यावेळी अमित शाहांनी सांगितले.
‘लोक आता मूर्ख राहिले नाहीत’, बच्चू कडूंच ठाकरेंवर टीकास्त्र
कर्नाटकातील भाजप सरकारने मुस्लिमांसाठीचे चार टक्के ओबीसी आरक्षण संपुष्टात आणले आणि वीरशैव-लिंगायत आणि वोक्कलिगा या दोन प्रमुख समुदायांमध्ये वाटप केल्याचे यावेळी अमित शाहांनी सांगितले. कर्नाटकातील मागील काँग्रेस सरकारने राज्यातील मुस्लिमांना आरक्षण दिले होते. परंतु भाजपने मुस्लिमांसाठीचे चार टक्के आरक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग (EWS) वर्गात हलवल्याचे यावेळी अमित शाहांनी सांगितले.
याच मुद्द्यांवरुन त्यांनी काँग्रेसला घेरले आणि काँग्रेस सरकारने ध्रुवीकरणाच्या राजकारणामुळे अल्पसंख्याकांना आरक्षण दिल्याचाही आरोप यावेळी अमित शाहांनी केला आहे.