‘लोक आता मूर्ख राहिले नाहीत’, बच्चू कडूंच ठाकरेंवर टीकास्त्र

‘लोक आता मूर्ख राहिले नाहीत’, बच्चू कडूंच ठाकरेंवर टीकास्त्र

नाशिक : कोकणातील खेडच्या सभेनंतर आज नाशिकमधील मालेगावात (Malegaon) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवगर्जना सभा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवगर्जना (Shivgarjana) सभेमुळे नाशिकमधील शिंदे गटाचं टेन्शन वाढलं असल्याचं दिसून येत आहे. यावरुनच शिंदे गटाचे मित्र पक्ष असलेले बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

बच्चू कडू म्हणाले, जाहीर सभेने मतपरिवर्तन होतं किंवा वातावरण चेंज होत असं नाही. बाळासाहेबांच्या देखील मोठ्याला सभा व्हायच्या पण मतपरिवर्तन होण्यासाठी मोठा काळ गेला. 20 वर्षानंतर शिवसेनेची सत्ता आली होती. शेतकऱ्यांच्या, कार्यकर्त्यांचा संपर्कात राहिले तर त्यांचे मतपरिवर्तन होईल. एखादी सभा घेतली म्हणून लोक लगेच दुसरा आमदार निवडून देत नाहीत. लोक आता मूर्ख राहिले नाहीत अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

Sudhir Mungantiwar : राज्यातील ‘इतकी’ नाट्यगृहे करणार सुसज्ज!

गर्जनेपेक्षा काम महत्वाचे आहे. गर्जनेने कोणाचे पोट भरले आहेत. इथं मंदीर बांधा, तिथं मस्जिद बांधा, तिथले भोगे काढा, इथले राहूद्या, हे काही लोकांचे प्रश्न नाहीत. रोज लोक भूकबळीने मरत आहेत. शेतकरी, कष्टकरी मजुरांचे किती हाल सुरु आहेत. लोक आता मूर्ख राहिले नाहीत. झेंडा बदलला, दुसरा झेंडा लावला म्हणजे त्या प्रवाहात वाहून जात नाहीत. लोकांच्या पोटापाण्याचे प्रश्न महत्वाचे आहेत, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये पहिलीच सभा पार पडणार असून विशेष म्हणजे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात ही सभा असणार आहे. दादा भुसेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार आहेत. याकडे नाशिकच्या जनतेसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube