Ram Satpute News :
माळशिरसचे आमदार राम सातपुते. भाजपमधील तरुण नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. मात्र आता हेच राम सातपुते भाजपमधील गटा-तटाच्या राजकारणात पडले आहेत का? असा सवाल विचारला जात आहे. त्याचं कारण ठरलं ते म्हणजे त्यांचं एक कथित पत्र. भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्वतःचे गट असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात होत असतात. (Along with MLA Ram Satpute 3 BJP MLA write letter to Sudhir Mungantiwar)
अशात सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रालयात पैसे घेऊन बदल्या होत असल्याचा आरोप खुद्द सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी केला आहे. ABP माझाने याबाबतचे वृत्त दिले आहे. भाजप आमदार हरिभाऊ बागडे, राम सातपुते, रणधीर सावरकर आणि शिवसेना आमदार आशिष जयस्वाल यांनी मुनगंटीवार यांना यासंबंधीचे पत्र लिहीले असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.
हेही वाचा : Eknath Khadse : माघारी फिरणार नाही! तावडेंची ऑफर धुडकावतं खडसेंनी कापले परतीचे दोर
सुधीर मुनगंटीवार परदेशात असताना (मार्च 2023 दरम्यान) त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांनी विविध 200 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र या बदल्या करताना घाई-गडबडीने आणि पैशांचे व्यवहार करुन झाल्या. उच्च पदावरील बदल्यांसाठी 12 ते 15 लाख आणि दुय्यम बदल्यांसाठी 3 ते 5 लाखांचे व्यवहार झाले, असा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. मात्र हे कथित आरोप असल्याचंही म्हटलं आहे.
हेही वाचा : Eknath Khadse : माघारी फिरणार नाही! तावडेंची ऑफर धुडकावतं खडसेंनी कापले परतीचे दोर
जेव्हा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना हा सगळा प्रकार लक्षात आला तेव्हा त्यांनी तातडीने या सर्व 200 बदल्यांना स्थगिती दिली. तसंच मुख्य वन संरक्षक यांना तात्काळ मंत्रालयात बोलवून घेतले. मंत्रालयात त्यांची चौकशी करण्यात येणार आहे, असाही दावा या वृत्तात करण्यात आला आहे.
वन खात्याने 31 मे 2023 रोजी 39 सहाय्यक वनसंरक्षकांच्या (एसीएफ) बदल्या केल्या आणि 12 जणांना त्याच जागेवर मुदतवाढ दिली. यातील काही बदल्या प्रादेशिक ते प्रादेशिक, तर काही जणांना पुन्हा तोच विभाग दिल्याची तक्रार मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. या बदल्यांमध्येही अर्थकारण झाल्याच्याही चर्चा असल्य चर्चा थेट मंत्रालयात होत आहे
आरोप केलेल्या आमदारांनी मुनगंटीवार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे का? याबाबत लेट्सअपने आमदार राम सातपुते यांच्याशी संपर्क साधला. यावेळी बोलताना या चर्चांना पूर्णविराम देत असा कोणताही गट नसल्याचं आणि आपण मुनगंटीवार यांच्याविरोधात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सातपुत म्हणाले, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि भाजपचा जुना कार्यकर्ता आहे. मी माझ्या मतदारसंघाबाबतील अडचणीबाबत बोलतो. एका भ्रष्ट वन अधिकऱ्याची बदली व्हावी यासाठी मी हे पत्र दिलं आहे. संबंधित बातमी देणाऱ्या ABP माझाच्या प्रतिनिधीसोबतही बोललो. मात्र केवळ संदर्भासाठी आपले पत्र वापरले असल्याचं संबंधित प्रतिनिधीने स्पष्ट केलं असल्याचं सातपुते यांनी सांगितलं.
या प्रकरणावर सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले, “माझ्या अनुपस्थितीमध्ये बदल्या झाल्या नाहीत. बदल्यांचे अधिकार मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. गुणवत्तेच्या आधारावर तुमच्या स्तरावर पारदर्शक पद्धतीने बदल्या करा असे मी सांगितले होते. मात्र यामध्ये काही आमदारांनी अधिकाऱ्यांविषयी गंभीर तक्रारी केल्या आहेत, त्यामुले मी माझ्या विभागाला सूचना केली, त्याची सगळी माहिती घेऊन चौकशी करा. चांगली जागा कोणालाही देताना त्याची गुणवत्ता तपासून घ्या. आता कारवाई निश्चितपणाने होईल, कुठेही शंका असेल तर कारवाई करा अशा सूचना दिल्या आहे,” असं ते म्हणाले.