Eknath khadse : माघारी फिरणार नाही! तावडेंची ऑफर धुडकावतं खडसेंनी कापले परतीचे दोर

Eknath khadse : माघारी फिरणार नाही! तावडेंची ऑफर धुडकावतं खडसेंनी कापले परतीचे दोर

Eknath Khadse News : विनोद तावडेंची ऑफर धुडकावत एकनाथ खडसेंनी परतीचे दोर कापले आहेत. मी कुठल्याही परिस्थितीत भाजपात जाणार नसल्याचं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. भाजप नेते विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. त्यावर खडसेंनी स्पष्टीकरण देत माघारी फिरणार नसल्याचं म्हटलंय. (Eknath khadse Speak On Vinod Tawade ‘s Offer)

Jejuri trusteeship controversy : …तेव्हा आले, आता विश्वस्तपदाचा वाद सोडवायला का नाही? पडळकरांचा शरद पवारांना सवाल

एकनाथ खडसे म्हणाले, विनोद तावडेंसोबत मी अनेक वर्षांपासून भाजपात काम करीत होतो. त्यांचं भाजपमध्ये मोठं योगदान आहे. कर्नाटक निकालानंतर विनोद तावडेंना जुन्या लोकांनी एकत्र यावं असं वाटतंय. एकत्र आल्यास निवडणुका जिंकण्यासाठी मदत होणार असल्याचं त्यांना वाटतयं म्हणूनच त्यांनी मली खुली ऑफर दिल्याचं खडसे म्हणाले आहेत. तसेच मी कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नसल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

72 Hoorain : दहशतवाद अन् ७२ कुमारिका मुली…; ‘७२ हूरें’, धमाकेदार टीझर प्रदर्शित

एका मुलाखतीत बोलताना विनोद तावडेंनी खडसेंवर विधान केलं होतं. यावेळी त्यांनी खडसेंनी भाजपात आलं पाहिजे, असं म्हटलं होतं. ‘मला असं वाटतं की, नाथाभाऊंनी परत आलं पाहिजे. पक्षात अशाप्रकारच्या लीडरशीपची गरज आहेच.

वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली

खडसे यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली जाण असून त्यांच्यासारखा नेता भाजपमध्ये असावा. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ लोकांनी येणं पण नुसतं येताना नाथाभाऊ ज्या स्पष्टपणे बोलतात तसं अपेक्षित नसेल. पण जी-जी माणसं पक्षात आली पाहिजे असं आम्हाला वाटतं त्यात नाथाभाऊ आहेत, असं तावडेंनी स्पष्ट केलं होतं.

जेजुरी विश्वस्तपदाचा तिढा सुटेना; जेजुरी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळांने घेतली राज ठाकरेंची भेट

राज्यात भाजपचे बड्या नेत्यांपैकी एक एकनाथ खडसे यांना मानलं जात होतं. 2014 नंतर खडसेच मुख्यमंत्री असतील असं समजलं जात होतं. मात्र, पंतप्रधानांनी देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. त्यानंतरच भाजपात फडणवीस आणि खडसे वार सुरु झाल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, आता राजकारणातले प्रतिस्पर्धी समजले जाणारे देवेंद्र फडणवीस आणि खडसे पुन्हा एकाच पक्षात दिसतील? अशा चर्चांना ऊत आलेला असतानाच एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करुन चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube