Download App

अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या सीईओपदी आनंद भंडारी; आशिष येरेकर यांची पदोन्नती…

Aashish Yerekar : राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या तर आता पुन्हा एकदा 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर (Aashish Yerekar) यांची अमरावती येथे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. येरेकर यांच्या जागी आता नगरच्या झेडपी सीईओपदी आनंद भंडारी यांची नियुक्ती झाली आहे.

PMO कार्यालयात उपसचिव ते बीडचे जिल्ह्याधिकारी, जाणून घ्या पुण्याचे नवीन आयुक्त नवल किशोर राम यांच्याबद्दल सर्वकाही

साधारण सव्वातीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर 2018 च्या बॅचचे आयएएस अधिकारी येरेकर यांची बदली झाली होती. तेव्हापासून येरेकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून येरेकर यांच्या बदलीच्या आदेश निघणार याबाबत चर्चा होती. अखेर बुधवारी सायंकाळी राज्य सरकारच्यावतीने राज्यातील आठ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत. यामध्ये येरेकर यांच्या जागी पुण्याहून भूमी अभिलेख विभागातून आनंद भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर येरेकर यांची पदोन्नती झाली असून अमरावती जिल्हाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पाण्याचा थेंब किती दूषित? जिल्ह्यातील दीड हजार गावांत पाणी तपासणी; FTK देणार झटपट रिपोर्ट

लंकेंशी संघर्ष मात्र पालकमंत्र्यांशी जवळीक…
झेडपीचे तत्कालीन सीईओ आशिष येरेकर यांच्या कार्यपद्धतीवरून खासदार निलेश लंके यांनी आक्षेप घेतला होता. त्यांच्याविरोधात लंके यांनी आक्रमक पवित्र देखील घेतला होता. मात्र, कोणत्याही दबावाला येरेकर हे बळी पडले नाही. लंके यांच्याशी संघर्ष जरी असला तरी दुसरीकडे ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी त्यांची जवळीक होती. राजकारण्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात येरेकर यांनी यशस्वीपणे काम पार पाडले आहे.

दरम्यान, पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले सेवा निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी नवल किशोर राम यांची पुणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे महानगर पालिकेचे सध्याचे आयुक्त राजेंद्र भोसले हे 30 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर 31 मे रोजी नवल किशोर राम हे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्विकारणार आहेत.

follow us