आनंदाच्या शिध्यावर झळकले अजितदादा; नेते बदलले, पिशवीचा रंगही बदलला पण शिधा तोच

Anandacha Shidha : गरिबाला सणाच्या दिवशी गोड खायला मिळावे या दृष्टीने राज्य सरकारकडून अवघ्या शंभर रुपयात आनंदाचा शिधा दिला जातो. यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेला आनंदाचा शिधा मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र यंदाच्या शिधा पिशवीवर अजित पवार यांचा फोटोही झळकला आहे तसेच पिशवीचा रंगही बदलण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हातील रेशन दुकानांत आनंदाचा शिधा […]

Anandacha Shidha

Anandacha Shidha

Anandacha Shidha : गरिबाला सणाच्या दिवशी गोड खायला मिळावे या दृष्टीने राज्य सरकारकडून अवघ्या शंभर रुपयात आनंदाचा शिधा दिला जातो. यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेला आनंदाचा शिधा मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र यंदाच्या शिधा पिशवीवर अजित पवार यांचा फोटोही झळकला आहे तसेच पिशवीचा रंगही बदलण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हातील रेशन दुकानांत आनंदाचा शिधा वाटप सुरु झाली आहे. नेत्यांचे फोटो आणि कलर बदलला असला तरी किटमध्ये पूर्वीप्रमाणेच चणाडळ, रवा, साखर, तेल देण्यात आले आहे.

राज्य सरकारने दिवाळी, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पाठोपाठ आता गणेशोत्सवातही आनंदाचा शिधा दिला जातो आहे. आनंदाचा शिधा किटमध्ये चनाडाळ, रवा, साखर प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर पामतेल देण्यात येते आहे. अजित पवारांचा गट सरकारमध्ये आल्याने आणि अजित पवार उपमुख्यमंत्री तर छगन भुजबळांना अन्न, नागरी पुरवठा खाते मिळाल्याने यंदाच्या शिधा किट पिशवीवर गणपती बाप्पासोबतच अजित पवारांचा फोटो आणि छगन भुजबळांचे नाव झळकले असून पिशवीचा रंगही बदलण्यात आला आहे.

नाणेफेक जिंकून भारताची गोलंदाजी, तिलक वर्माचे पदार्पण; संघात पाच बदल

मागील वर्षापासून राज्य सरकारने आनंदाचा शिधा सुरु केला आहे. यंदाही राज्यातील एकूण एक कोटी 65 लाख 60 हजार 256 शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. डाळीही महागल्या आहेत. खाद्यतेलाचे दर आवाक्यात असले तरी गोरगरिबांना दैनंदिन रोजगारात दिवळीसह अन्य सणही साजरे करणे सोपे नाही. त्यामुळे आनंदाचा शिधा गरिबांना दिलासा देणारा आहे.

https://youtu.be/6T2Jqhk8vEI?si=v2llec6jtsVqfZrg

Exit mobile version