कॅप्टन खरात शिंग आणून पूजा करायचा, श्रीमंतांना कस्तुरी द्यायचा; कोणी केलाय धक्कादायक दावा ?

Ashok Kharat : काही उच्चभ्रू लोकांना कस्तुरी देत होता. त्यामुळे वन्यजीव कायद्याअंतर्गत त्याची चौकशी करावी.

Ashok Kharat

Ashok Kharat

Anis Krishna Chandgude on Ashok Kharat : अंकशास्राच्या माध्यमातून भविष्य सांगणारा आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) पोलिसांनी अटक केलीय. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. या पथकाकडून आणि नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून कॅप्टन खरातची चौकशी सुरू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली आहे. तसेच अशोक खरातबाबत खळबळनजक दावे गेले आहे.

अशोक खरातला सही सलामत कोण सोडविणार होतं, सातपुते यांची नियुक्ती कशासाठी ? पडद्याआडची स्टोरी

अंनिसचे (Anis ) राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे ( Krishna Chandgude) यांनी काही धक्कादायक दावे केले आहेत. कॅप्टन खरात हा भोंदू बाबा हरणाचे शिंग आणून पूजा करत होता. काही उच्चभ्रू लोकांना कस्तुरी देत होता. त्यामुळे वन्यजीव कायद्याअंतर्गत त्याची चौकशी करावी, अशी मागणी चांदगुडे यांनी केलीय. या आधीच आम्ही खरातबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आम्हाला अशोक खरातच्या माणसाकडून धमक्या आल्या. आमच्या लोकांवर पिस्तुल रोखले होते. त्यामुळे आता यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे चांदगुडे यांनी सांगितले आहे. अंनिसच्या सदस्यांनी काही गोपनीय माहिती आणि काही फोन नंबर एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांना दिले आहे.


Ashok Kharat : सोलापुरात ऑपरेशन परिवर्तन ते पुणेकरांना शिस्त; कॅप्टनचा ‘गेम’ ओव्हर सातपुते करणार


माझ्याकडे पिस्तूल असल्याचे सांगून धमकाविले

अंनिसचे पदाधिकारी महेंद्र दातरंगे यांनी एक गंभीर आरोप केलाय. ते म्हणाले 2008 मध्ये आम्हाला या बाबतीत माहिती मिळाली होती. आम्ही कॅप्टनची भेट घेऊन त्याला सांगितले की, तू भोंदूगिरी करतो. तू डँबिस आहेस. त्यावेळी तो बोलला मी निवृत्त कॅप्टन आहे. माझ्याकडे पिस्तुल आहे. त्याने धमकी दिली होती. त्याला एक संधी द्यावी म्हणून तक्रार दाखल केली नव्हती, अशी माहिती दातरंगे यांनी दिलीय.

Exit mobile version