Anna Hajare On Parth Pawar land Scam: पुण्यातील दोन हजार कोटींच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार (Parth Pawar) रडारवर आला आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही कोंडी झालीय. यावरून आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कान टोचले आहे. मंत्र्यांची मुलं जर असं वागत असतील तर मंत्र्यांचा दोष आहे. संस्कार हे महत्त्वाचे असतात, कुटुंबातील संस्कार हे महत्त्वाचे असतात अशा शब्दात हजारे यांनी अजित पवारांना फटकारले आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील तब्बल 40 एकर जमीन अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीने 300 कोटींमध्ये खरेदी केलीय. या व्यवहारावरून सध्या पार्थ पवार हे चांगलेच अडचणी सापडले आहेत. यावरती ज्येष्ठ सन्माजसेवक समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आरआरएसचा आहेस तर इकडे कशाला? राज ठाकरेंनी खडसावलं? पिट्याभाई म्हणाला, ते आमचे कान ओढू…
मंत्र्यांची मुलं असं कत असतील, तर ते चुकीचं
यावेळी बोलताना अण्णा हजारे म्हणाले, की मंत्र्यांची मुलं असं करत असतील तर हे चुकीचं आहे. कुटुंबाची संस्कार होणे हे महत्त्वाचे आहेत. आज राळेगण सिद्धी एवढे मोठे गाव असताना कुठलाही अनूचित प्रकार या ठिकाणी घडत नाही. असे संस्कार मुलांमध्ये रुजवली पाहिजेत. आपल्याला मानवी जीवन कशासाठी मिळाले खाणा, पिणा आणि ऐशो आरामात जीवन जगायचं यासाठी जीवन मिळालेलं नाही. आपलं कर्तव्य काय आहे याचा तुम्ही जीवनामध्ये विचार केला पाहिजे असा सल्ला यावेळी अण्णा हजारे यांनी मंत्र्यांच्या मुलांना दिला.
कानावर आलं तेव्हा स्पष्ट सूचना दिल्या होत्या पण… जमीन खरेदी अजित पवारांना खटकलं पण पार्थ यांनी रेटलं
गैरकृत्य करणाऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे
आज देशाची एवढी मोठी लोकसंख्या आहे. मी कुठे कुठे लक्ष देणार. मुलांवर ती चांगले संस्कार करायचे तसेच त्यांच्यामध्ये सुधारणा कशा होतील याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे केवळ कारवाई करून उपयोग नाही तर सरकारने धोरण अवलंबले पाहिजे, कठोर पावले उचलले पाहिजे तसेच अशा गैरकृत्य करणाऱ्यांवर ती कठोर शासन झाले पाहिजे, असे देखील यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले.
