Download App

Apmc Election Ahmednagar : जिल्ह्यातील बाजार समित्यांत 93 टक्के मतदान, कोण मारणार बाजी, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

  • Written By: Last Updated:

Apmc Election Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यातील सात तालुका कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज मतदान शांततेत प्रक्रिया झाली. यात 96.77 टक्के मतदान झाले. मतमोजणीची प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपासून सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील सात बाजार समित्यांची दोन दिवसांपूर्वीच मतदान प्रक्रिया झाली. त्यानंतर आज उर्वरित सात म्हणजेच नेवासे, कोपरगाव, राहाता, अकोले, श्रीरामपूर, शेवगाव व जामखेड तालुका बाजार समित्यांसाठी मतदान प्रक्रिया झाली. यात नेवासेत 96.23 टक्के, कोपरगावमध्ये 93.70, राहातामध्ये 9816, अकोलेत 95.95, श्रीरामपूरमध्ये 98.69, शेवगावमध्ये 97.71 तर जामखेडमध्ये98.80 टक्के मतदान झाले. 15 हजार 463 मतदारांपैकी 14 हजार 963 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या मतदानाच्या वेळी तीन ठिकाणी राजकीय कार्यकर्त्यांत वाद झाला होता. त्यामुळे आज मतदान व मतमोजणी प्रक्रियेला कडेकोट बंदोबस्त देण्यात आला होता. सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. सायंकाळी चार वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात मतदान झाले. उमेदवारांकडून मतदारांना वाहनांद्वारे आणण्यात आले. भाजप-शिवसेना व महाविकास आघाडी दोन्हींकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

‘मन की बात’ सुरु अन् नारायण राणेंना लागली ‘डुलकी’

Tags

follow us