‘मन की बात’ सुरु अन् नारायण राणेंना लागली ‘डुलकी’
PM Modi Man Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या ‘मन की बात’ (Mann ki Baat)रेडिओ कार्यक्रमाचा आज 100 वा भाग प्रसारित केला गेला. कार्यक्रमाच्या शतकपूर्तीनिमित्त भाजपकडून जोरदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान हा कार्यक्रम पाहत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भर कार्यक्रमातच डुलकी लागल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान यापूर्वीही अनेक मंत्री महोदय भर स्टेजवरच डुलक्या घेत असल्याच्या घटना घडल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ प्रसारणाचा 100 वा भाग हा अभूतपूर्व बनवण्यासाठी भाजपने (BJP)सर्वतोपरी प्रयत्न केले होते. देशभरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी 100 ठिकाणी ऐकण्यासाठी सुविधांचे आयोजन केले होते. मिळालेल्या माहितीनुसार मोदींचे भाषण ऐकण्यासाठी भाजपने विदेशासह सुमारे 4 लाख ठिकाणी व्यवस्था केली होती.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुलाबराव पाटलांना धक्का, महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
तसेच अनेक नेतेमंडळींनी देखील खुद्द पुढाकार घेत या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रेक्षेपणसाठी मोठी कसरत केली होती. यातच भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवलीमध्ये मन की बात या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रेक्षेपणाचे आयोजन केले होते. मात्र यावेळी मोदींचे भाषण ऐकत असताना नारायण राणे यांना डुलकी लागली होती.
उद्धव ठाकरेंना नाचवण्याचे काम राष्ट्रवादी करतेय, दरेकरांचा हल्लाबोल
नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये
या व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे हे एका सोफ्यावर बसले आहे. मन की बात हा कार्यक्रम पाहत असताना नारायण राणे यांना डुलकी लागली. त्यावेळी नितेश राणे मात्र भाषण ऐकत होते.