जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुलाबराव पाटलांना धक्का, महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Jalgaon Agricultural Income Market Committee elections : गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी(Election of Market Committees) शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता बाजार समित्यांचे निकाल समोर येऊ लागले. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Jalgaon Agricultural Produce Market Committee) निकाल आता समोर आला असून या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या शिवसेना-भाजप युतीला धक्का बसला आहे. जिल्हयाचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडी ने 10 विरुद्ध 8असा पराभव केला आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, महाविकास आघाडीने कडवी झुंज देत दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत मविआच्या पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळं शिंदे गटाच्या पदरी निराशी पडली आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटाच्या पॅनलने निवडणूक लढवली. तर महाविकास आघाडीच्या पॅनलचे नेतृत्व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केलं. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार करण्यात आला होता. त्यामुळं अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणूकीत महाविकास आघाडीने शिंदे गटाला धुळ चारली आहे. यात 18 जागांपैकी 10 जागा जिंकून महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर शिंदे गटाच्या पदरी सातच जागा मिळाल्या आहेत. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. या निकालामुळं पालकमंत्री पाटील यांनी जोरदार धक्का बसला आहे.
नारायण राणेंना मंत्रिपद दिलं, शिवसेना तिथचं चिडली; शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा
गुलाबराव पाटील यांनी स्वत:चा मतदार संघ राखला
जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटिल यांनी स्वतचा मतदार संघ असलेल्या एरंडोल – धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा गड राखला आहे. या बाजार समियीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराब पाटिल यांनी १८ पैकी १२ जागा जिंकल्या आहेत. या ठिकाणी त्यांचे प्रतिस्पर्धी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पॅनलला धक्का बसला आहे.